कोल्हापुरातील ‘या’ स्थानिक नेत्या सोबत मुख्यमंत्र्यांनी केली बंद दाराआड चर्चा

कोल्हापूर प्रतिनिधी | मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाचे संस्‍थापक अध्‍यक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांनी भेट घेतली. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्‍यांची बंद खोलीत चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशिल समजू शकला नाही. याशिवाय संभाजी भिडे तसेच शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके, आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनीही मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली. युतीसाठी शिवसेनेचा … Read more

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी ६० वर्षांपूर्वीच्या झाडांची केली कत्तल

कोल्हापूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे आज सोमवारी (ता. १६) कोल्हापुरात आगमन होणार आहे. सांगलीवरून कोल्हापुरात येताना अंकली पुलावर त्यांचे स्वागत होणार करून इचलकरंजीत त्यांची सभा होणार आहे. तसेच मंगळवारी शहरातून यात्रा काढण्यात येणार असून कळंबा, इस्पुर्ली, मुधाळतिट्टा आणि राधानगरीत छोट्या सभा होणार आहेत. अशाप्रकारे महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. … Read more

कोल्हापूरात पुन्हा येणार पूर ; शहरात भीतीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्यात येऊन गेलेल्या महापुराच्या आठवणी काढल्या तरी अंगावर क्षहारे उभा राहतो. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेने कोल्हापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने आणि सोमवार पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कोल्हापुरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पंचगंगा नदीच्या पात्रात … Read more

महापुरात हरवलेले कोल्हापूरचे वैभव सर्व मिळून पुन्हा उभा करू : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी | महापूराने हरवलेलं कोल्हापूरचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करुया, शासन, समाज आणि गणेशोत्सव मंडळानीही याकामी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी भरीव कार्य करुया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले. कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने येथील केशवराव भोसले नाटयगृहात आयोजित केलेल्या गणराया ॲवॉर्ड वितरण सोहळयाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. समारंभास … Read more

धनंजय महाडिकांचं पण ठरलं ! या दिवशी करणार भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये जाणार असणाऱ्या शक्यतेला आता मूर्त रूप मिळत असल्याचे दिसते आहे. कारण त्यांनी गुप्तपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून येत्या ३१ ऑगस्ट रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असे देखील सूत्रांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी … Read more

कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव म्हणजे वर्षभर सळसळती ऊर्जा देणारा आनंद सोहळाच असतो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अगदी परदेशात जरी कोणी गेले असेल तरी प्रत्येक कोल्हापूरकर गणेशोत्सवासाठी हजेरी लावतोच, पण यंदा कोल्हापूरला महापूरान विळखा घातल्याने कोल्हापूरचे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव अगदी साधेपणान साजरा करायचा असे कोल्हापूरकरांनी ठरवले आहे. महापुराने अनेकांचे संसार उद्धवस्त … Read more

या तारखेला राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक करणार भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय महाडिक १ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अमित शहा यांच्या हस्ते प्रवेश घेतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. २०१४ साली … Read more

राष्ट्रवादीचा हा माजी खासदार करणार भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये समावून घेण्यची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राभवण्यात आली होती. तीच प्रक्रिया विधनासभा निवडणूक पार पडे पर्यंत राभवलीजाईल असे चंद्रकांत पाटील यांनी भाकीत केले होते. त्यांचे भाकीत सध्या सत्यात उतरत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबण्याचे नावच घेत नसल्याने सध्या चित्र आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात … Read more

तीन तगड्या अधिकाऱ्यांची कोल्हापूरात नेमणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | शहरात उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने दोन उपायुक्त व एक सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची कोल्हापूर महापालिकेकडे नियुक्ती केली आहे. सोमवारी (ता. १२) सरकारचे सहसचिव एस. एस. गोखले यांनी आदेश काढले. त्यानुसार पुणे महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे, संतोष भोर तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. … Read more

अमोल कोल्हेंनी ठोकले पूरग्रस्त भागात तळ

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, राज्यभरातून मदत पुरवली जात आहे. तसेच विविध पक्षातील नेतेही सर्वोतोपरी मदत करतांना दिसून येत आहे. त्यात शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पूरग्रस्त भागात तळ ठोकून असून, पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. दोन्ही जिल्ह्यात आलेल्या पुरानंतर अमोल कोल्हे यांनी … Read more