Saturday, March 25, 2023

कोल्हापुरातील ‘या’ स्थानिक नेत्या सोबत मुख्यमंत्र्यांनी केली बंद दाराआड चर्चा

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी | मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाचे संस्‍थापक अध्‍यक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांनी भेट घेतली. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्‍यांची बंद खोलीत चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशिल समजू शकला नाही. याशिवाय संभाजी भिडे तसेच शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके, आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनीही मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली.

युतीसाठी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला ; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

- Advertisement -

मुख्‍यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेच्‍या निमित्ताने आजपासून दोन दिवस काेल्‍हापूर दौर्‍यावर आले आहेत. रात्री त्‍यांना भेटण्‍यासाठी विविध संघटना, सामाजिक संस्‍था आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. साडेनऊ वाजण्‍याच्‍या सुमारास मुख्‍यमंत्री फडणवीस यांचे मुक्कामाच्‍या ठिकाणी आगमन झाले. मध्‍यवर्ती बस स्‍थानकाजवळील एका हॉटेलमध्‍ये ते उतरले आहेत. माजी मंत्री कोरे यांनी मुख्‍यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरे यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्‍यांनी चर्चा केली.

बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

विनय कोरे यांना युतीत सामावून घेतल्यास त्यांना त्यांच्या आवडीचे मतदारसंघ देणे भाजपला कठीण जाणार आहे. कारण शिवसेना त्या मतदारसंघावर दावा सांगणार आहे. अशा स्थितीत स्वबळावर निवडणूक झाल्यास विनय कोरे यांच्या पक्षाचा कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला फायदा होऊ शकतो त्यामुळे विनय कोरे यांना मुख्यमंत्र्यांनी एवढे प्राधान्य दिले आहे.

काँग्रेस सोडलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर