अबब! दांडपट्ट्याने कापले तब्बल ४००० लिंबू; कोल्हापूरच्या गफूरने केला विक्रम

प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधत शांतीदूत मर्दानी आखाड्याचा खेळाडू गफूर मुजावर याने दांडपट्ट्याने सपासप वार करत ४००० लिंबू कापण्याचा विक्रम नोंदवला. यासाठी त्याला एक तास ५८ मिनीटांचा कालावधी लागला. सकाळी साडेनऊ वाजता पद्मावती मंदिराच्या पिछाडीस एनसीसी रेसकोर्स रस्त्यावर याचे आयोजन केले होते.

राज्यातील १७ हजार पतसंस्थांनी पाळला बंद; ठोक अंशदानाच्या निर्णयाला विरोध

राज्यातील बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या गैरकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पतसंस्था नियामक मंडळाचा एक निर्णय पतसंस्थांच्या आर्थिक प्रगतीला गतिरोधक ठरू लागला आहे. त्यामुळं राज्यातील सुमारे १७ हजाराहून अधिक पतसंस्थांनी या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी पतसंस्थांनी आज एक दिवसाचा बंद पाळाला आहे.

कोल्हापुरात शिवभोजन योजनेला सुरुवात; मंत्री सतेज पाटीलांनी शिवथाळीचा घेतला आस्वाद

राज्य सरकारच्यावतीने दहा रुपयात शिवथाळी हा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरात देखील झाली आहे. कोल्हापूर शहरात चार ठिकाणी हा उपक्रम आजपासून सुरू झाला आहे. गोर गरीब आणि गरजू नागरिकांना दहा रुपयात शिव थाळी देण्यात आलेली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं .

पुणे-बेंगलोर महामार्गावर भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; २ ठार, ६ जखमी

पुणे-बेंगलोर महामार्गावर ओमनी व्हॅन आणि उसाच्या ट्रॉलीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात कोल्हापूर मधील दोघे जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत.

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; 90 दिवसांत होणार काम पूर्ण

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि श्री जोतिबा मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. मुंबई येथील स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टन्स प्रा. लि. या कंपनीने दोन्ही मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट अगदी नाममात्र मानधनात करून देणार आहे. प्रत्यक्ष कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार असून देवस्थान समितीच्या वतीने कंपनीसोबतचा पत्रव्यवहार पूर्ण केला आहे. 90 दिवसांत दोन्ही मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट कंपनीने पूर्ण होणार आहे. मंदिर संवर्धनासाठी याचा उपयोग होणार आहे.

तरुणांवर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकास अटक

अंबाई टँक परिसरात खाद्यपदार्थांच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादातून दोघा तरुणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक दत्ता विलास टिपुगडे (वय ५०, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, यापूर्वी त्याचा मुलगा सागर टिपुगडे याला अटक केली होती.

तंबाखू प्रोसेसचे कारखाने बंद करा! जयसिंगपूरमधील नागरिक आक्रमक

जयसिंगपूर येथील झेले कॉलनी मादनाईक मळा परिसरामध्ये सुरू असलेले तंबाखू प्रोसेसचे कारखाने बंद करावेत या मागणीसाठी या परिसरातील परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकारी कक्षामध्ये धडक मारली. संतप्त बनलेल्या नागरिकांनी तंबाखूची धस मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘स्मशानभूमीमध्येच रक्तदान’ !! वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी गारगोटीत अनोखे आंदोलन

भुदरगड तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा अकार्यक्षम झाली आहे. भुदरगड तालुक्यातील रुग्णांना शासनाच्या वतीने चांगले उपचार मिळावेत, गारगोटी ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांना पुरेसे डॉक्टर, नर्सेस, टेक्निकल स्टाफ द्यावा, मोफत औषधांचा पुरवठा व्हावा या मागणीसाठी गारगोटी शहरातील स्मशानभूमीत रक्तदान शिबिर घेऊन आंदोलन करण्यात आले.

आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा; कोल्हापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक

अंगणवाडी महिलांना दिलेली भाऊबीज शिमगा आला तरी दिला जात नाही. तालुका व जिल्हा प्रशासनाच्या गैरसोयीमुळे अंगणवाडी शिक्षिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन एक सांगत आहे आणि प्रशासन एक सांगत आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांची आर्थिक कोंडी होत असल्याचं मत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ.आप्पा पाटील यांनी व्यक्त केलं.

कोल्हापूरकरांसाठी खूशखबर! मटणदरावर अखेर तोडगा

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर येथील मटण दरावर आज तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून मटण दर निश्चित करण्यात आले आहेत. कोल्हापूरात मांसाहार खाणार्‍यांची संख्या बहुसंख्य आहे. अशात मागील काही महिण्यांपासून कोल्हापूर येथे मटणाचे दर गगणाला भिडले होते. मात्र आज अखेर यावर तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून … Read more