कोल्हापूर महापालिकेचा ‘सत्ता पॅटर्न’ आता राज्यात लागू होणार?

शिवसेना-भाजपा वेगळे होऊन सेना आघाडी सोबत गेल्यास त्याचा सर्वाधिक फायदा कोल्हापूर महानगरपालिकेला होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेला सोबत घेऊन ‘आघाडी’ने सत्ता स्थापन केली आहे. हाच कोल्हापुरी पॅटर्न आता राज्यात आकाराला येत आहे. गेल्या ४ वर्षांपासून कोल्हापूरात भाजपा – ताराराणी आघाडीला बाजूला ठेवून काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना सत्तेत आहेत. त्यामुळे शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत सत्तास्थापन केल्यास अप्रत्यक्षरीत्या ही सत्तास्थापना कोल्हापूर पॅटर्नचाच पुढचा टप्पा म्हणावा लागेल.

चंद्रकांतदादांकडून कोथरूडच्या जागेपायी कोल्हापूरचा पालापाचोळा

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने ‘सेना-भाजपा’ला चितपट करत जोरदार मुसंडी मारली आहे. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचा गड सांभाळण्यात सपशेल अपयश आलं आहे. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात भाजपा- सेनेला धक्का देत काँग्रेस- राष्ट्रवादीने धक्कादायक विजय मिळवला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या या विजयामुळे कोल्हापूर हा महाआघाडीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज मातब्बरांना पराभव पत्करावा लागला आहे.   

इचलकरंजी मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत असणाऱ्या दातार मळा इथं एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्या जवळ असणाऱ्या १० लाख १ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

ऋतुराज पाटील यांची ‘गोकुळ’ वाढणार ताकद !

जिल्हा दूध उत्पादक संघातील (गोकुळ) माजी आमदार पी. एन. पाटील गटातील पाच संचालकांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. शिवाजी विद्यापीठाजवळ राम मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात पी. एन. यांच्यासह आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, उदय पाटील हे संचालक उपस्थित होते.

सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे.

या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी चाचपणी

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवायचं पक्क केल्याची कोल्हापुरात चर्चा आहे. शिवसेनेशी युती झाल्यास ते ‘कोल्हापूर उत्तर’मधून जनतेचा कौल आजमावतील आणि युती न झाल्यास राधानगरी-भुदरगड मतदारसंघाला त्यांची पसंती राहील, असे बोलले जात आहे. ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका? भाजप शिवसेना युतीचा जागावाटपाचा … Read more

महापुराचा फायदा घेत घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक; संशयिताकडून ११ गुन्ह्याची कबुली

कोल्हापूर प्रतिनिधी । पूरपरिस्थितीत पूरग्रस्त भागातील बंद घरांना टार्गेट करून ११ घरफोड्या करणाऱ्या संशयिताना करवीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश रघुनाथा चव्हाण (वय.२७ रा. मूळ कोते, सध्या रा. वडणगे ता. करवीर) योगेश बाबुराव संकपाळ (वय.३१ रा. लोणार वसाहत, उचगाव) आणि धोंडीराम उर्फ रामा रंगराव पाटील (वय.३३ रा. वडणगे ता. करवीर ) अशी त्याची नावे आहेत. … Read more

कॉ.गोविंद पानसरे हत्येप्रकरणी तीन आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आज आणखी तीन आरोपींना 10 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपी गणेश मिस्कीन आणि सचिन बद्दी अशा तिघांचा यामध्ये समावेश आहे. या सुनावणीवेळी संशयित आरोपी सचिन अंदुरे याने तपासाधिकारी … Read more

एसटी पण ठरू शकते सिरीयल किलर.. आतापर्यंत घेतले १२ बळी

कोल्हापूर प्रतिनिधी | आतापर्यंत आपण एखादा मानसिक रुग्ण, गुन्हेगार अथवा दहशतवादी यांना सिरीयल किलर म्हणून पहिले असेल. पण जर तुम्हाला निर्जीव वस्तू सिरीयल किलर असू शकते का ? असा प्रश्न विचारला तर काय उत्तर देणार.. हो कि नाही. तर या प्रश्नच उत्तर हो आहे असं म्हणता येऊ शकत कारण आपण ज्या एसटी बद्दल माहिती जाणून घेणार … Read more

कडकनाथ भ्रष्टाचार, शाहूवाडीत 80 शेतकऱ्यांची दीड कोटीची फसवणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचार घोटाळे ची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. सांगली इस्लामपूर व कोल्हापूर जिल्ह्यासह शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्या वस्तीवर सुद्धा या कोंबडी भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढू लागलेली आहे. कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचारात शाहूवाडी तील शेतकऱ्यांची दीड कोटीची फसवणूक झाली असून रयत ऍग्रो कंपनी ने कडकनाथ कोंबड्यांच्या नावाखाली सुमारे … Read more