लता दीदींचे डॉक्टर ‘पहा’ काय म्हणतात…

संपूर्ण उपचारांविषयी सांगताना, डॉ. प्रतीत म्हणाले, “लता मंगेशकर यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, तेव्हा त्यांना बरं करू हा विश्वास घरच्यांना देणं आमच्यासाठी फार कठीण होतं. खरं तर गेले 28 दिवस फार तणावात होते. पण मला याचा आनंद आहे की माझ्या टीमने त्यांच्यावर उपचार केले आणि त्या आता अगदी बऱ्या आहेत.”

राज ठाकरेंनी केली लता दीदींच्या आरोग्यांसाठी विशेष प्रार्थना

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.