‘लेंन्स’ वापरताय ? आधी हे जाणून घ्या …
पूर्वी डोळ्याला नंबर लागला तर चष्म्याशिवाय काही पर्याय नव्हता . पण काळ बदलला तसा लोक लेन्सेसला पसंती द्यायला लागले . डोळ्यावर चष्मा संभाळण्यापेक्षा लेन्स सोयीस्कर वाटू लागले . वापरायला सोपे आणि किंमतही खिशाला परवडणारी असल्याने लेन्सची लोकप्रियता वाढली . मग हळूहळू त्यात कलर्ड लेन्सने एन्ट्री केली . आता डोळ्याला नंबर नसेन तरी डोळ्याचा रंग बदलण्याच्या आकर्षणाने अनेक जण लेन्स वापरतात . लेंन्सने डोळ्यांचे सौंदर्य नक्कीच खुलून येते, परंतु या लेंन्स लावताना डोळ्यांची आणि लेंन्सचीही विशेष काळजी घ्यावी लागते. प्रखर ऊन , धूळ आणि मेकअपने देखील डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यासाठी लेंन्स लावताना आणि काढताना डोळ्यांची कशी काळजी घ्यायची हे पाहुयात.