मंदिरात पूजा करणार्‍या भाजप नेत्याला केरळ मध्ये अटक; लाॅकडाऊनच्या उल्लंघनाचा ठपका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन लागू केलेला आहे तसेच सरकारने सर्व प्रकारच्या सभांनादेखील बंदी घातलेली आहे. दरम्यान, केरळमधील सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंदिरप्रमुखांसह पाच जणांना नुकतेच अटक करण्यात आली आहे. मंदिरातील धार्मिक विधीवेळी मंदिर प्रमुखांनी जमाव गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एरुमापट्टी पोलिसांनी … Read more

धक्कादायक! अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची तस्करी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे टेम्पोच्या पुढील भागातील काचेवर औषधे आणि अत्यावश्यक सेवेचा कागद चिकटवून कर्नाटकातून क-हाडला जात असलेला तब्बल ८ लाखाचा गुटखा आटपाडी पोलिसांनी पकडला. उंबरगाव येथे तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. चालक ध्रुपचंद प्रेमचंद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक बजरंग कांबळे यांच्यासह उपनिरिक्षक अजित पाटील, … Read more

SBI ला झटका! ४११ करोड रुपयांचा चूना लाऊन ‘या’ कंपनीचा मालक भारतातून फरार

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) ११ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदेव इंटरनॅशनल असे फसवणूक केलेल्या कंपनीचे नाव असून कंपनीचे मालक भारतातून फरार झाले असल्याचे समजत आहे. सदर प्रकार उघड झाल्यानंतर या कंपनीचे मालक देशातून पळून गेले आहेत. सीबीआयने अलीकडेच त्यांच्याविरोधात … Read more

नोकरी गेली तरी घाबरू नका! मोदी सरकारची ही योजना आपल्याला देईल पुढील २ वर्षांसाठी पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे. यामुळे बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे तर कुठेतरी वेतन कपात केली जात आहे. या संकटात असे कोणतेही उद्योग नाही आहेत जेथे लोकांच्या नोकर्‍यावर संकट आलेले नाही. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. आपल्याला देखील नोकरी संबंधित समस्या येत असल्यास,ही … Read more

पाकिस्तान मध्ये आज पासून लाॅकडाउन हटणार; इम्रान खान म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आजपासून आपल्या देशातील लॉकडाउन हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला आहे असे मुळीच नाही. परंतु इम्रान खान यांचा असा युक्तिवाद आहे की जर पाकिस्तानमध्ये लॉकडाउन सुरु ठेवण्यात आला तर व्हायरसपेक्षा मोठा विनाश होईल कारण सरकारकडे पुरेसे पैसेच नाही आहे. भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये … Read more

बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीची पुन्हा सरावास सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला बऱ्याच दिवसानंतर फुटबॉलचा सराव करताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंददायक भावना होती. शुक्रवारी स्पॅनिश लीगमधील इतर काही खेळाडूंसह त्याने खासगी सराव सत्रात भाग घेतला. कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे स्पेनमधील लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू जवळजवळ दोन महिने ग्राउंडवर उतरू शकलेले नाहीत. खेळाडूंचा सराव सुरू होणे म्हणजे देशांतर्गत … Read more

सोन्या चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊन असूनही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने मोठा बदल होत आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर बुधवारीच्या तुलनेत ३५७ रुपयांनी वाढून ४६२२१ रुपये झाले. जर आपण २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे तर शुक्रवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याच्या ९१६ ची किंमत ४२३३८ रुपये होती.बुधवारी पूर्णिमाच्या दिवसामुळे बाजार काल बंद झाला होता. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदीचा … Read more

येत्या १० दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली । देशभरातील सार्वजनिक वाहतुक सुरु करण्याबाबत एक महत्वाचा निर्णय केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या १० दिवसात देशभरातील सार्वजनिक वाहतूक सुरु होणार असल्याचं गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन लागू झाल्यापासून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, बंद असलेली … Read more

लॉकडाऊन ३१ मेपर्यंत लांबणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई । राज्यातील कोप्रादुर्भाव वाढतच असून तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार असल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

धक्कादायक! मुंबईमधील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरुंगातील एका स्वयंपाकीच्या माध्यमातून एकाच बॅरेकमधील या ७२ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कोरोनाबाधित कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तुरुंगात असलेल्या … Read more