‘माझ्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या’ – आदित्य ठाकरे

मुंबईमध्ये कोल्हापूर भवनाची उभारणी करणार आणि पहिल्याच वर्षी रखडलेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गडहिंग्लज येथे केली. येथील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेनेचे कागल विधासभेचे उमेदवार संजय घाटगे आणि चंदगड विधानसभेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांच्या एकत्रित प्रचाराचा शुभारंभ ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी ‘माझे साथी आणि सोबती’ म्हणून दोघांना निवडून विधानसभेत पाठवा असे आवाहन उपस्थितांना केले.

बिग बॉस फेम ‘बिचुकलें’ची संपत्ती पाहून व्हाल थक्क!

कायम चर्चेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. बिचुकले यांनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी घेणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचारात उडी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. ते महाराष्ट्रात दोन दिवस प्रचार करणार आहेत. राहुल गांधी नुकतेच कंबोडिया दौरयावरून मायदेशी परतले आहेत. राहुल गांधी हे प्रचारासाठी मैदानात उतरणार असून आम्ही ही निवडणूक संपूर्ण ताकदीनीशी लढवू असं मत काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी व्यक्त केलं.

आघाडीच्या फक्त ४० जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी वर टीकास्त्र सोडले आहे. ‘येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस , राष्ट्रवादी आघाडीच्या फक्त ४० जागा असतील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ही त्यांना मिळणार नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार

जिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

छगन भुजबळांना मोठा धक्का! माणिकराव शिंदेंचा सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाल्यानंतर येवल्यातून शिवसेनेनं संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. कारण, भुजबळांवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्याशी हात मिळवणी केली आहे. निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे येवल्यामध्ये राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेची ताकद वाढली अशी चर्चा आहे.

सिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवा; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा येथील मतदान केंद्र रोमपली येथे न हलविता सिरकोंडा येथेच कायम ठेवण्याची मागणी सिरकोंडा येथील गावकऱ्यांनी केली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

पिंपरीमधील महायुतीच्या उमेदवाराचे ‘फेसबुक अकाऊंट हॅक’; सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल

पिंपरी मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढाणारे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अगोदर चाबुकस्वार यांनी फेसबुकच्या अकाऊंटशी संलग्न असणारे मोबाईल क्रमांक, मेल आयडी हॅक झाले. त्यानंतर त्यांचे अकाऊंटच डिलीट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागील सूत्रधार कोण आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. चाबुकस्वार यांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी सायबर क्राईममध्ये या घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का; अमरीश पटेल भाजपा मध्ये प्रवेश करणार

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरही काँग्रेसला लागलेली गळती थांबलेली नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल हे भाजपात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (९ ऑक्टोबर) शिरपूरमध्ये सभा होत आहे. या सभेतच ते भाजपात प्रवेश करणार आहे.

काश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार

पुण्यात आज राजकीय धुमश्चक्री होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मंगळवारीच पुण्यात दाखल झाले आहेत. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन केल्यानंतर आज राज ठाकरेंची सभा आज पुण्यात होत आहे. दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने भाजपने बालाकोट मुद्दा उपस्थित केला होता, त्याच धरतीवर विधानसभा निवडणुकीत काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. लडाखमधील जामयंग त्सेरिंग नामग्याल या खासदाराला सोबत घेत भाजपच्या वतीने पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.