शरद पवारांनी सत्तेच्या काळात जे केले त्याचीच पुनरावृत्ती होत आहे : रामदास कदम

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेनेतून छगन भुजबळ व नारायण राणे यांना फोडले होते. सत्तेत असताना त्यांनी जे केले होते त्याचीच आज पुनरावृत्ती होत आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. नारायण राणे यांना काँग्रेसने नव्हे तर शरद पवारांनी फोडलं,असा खळबळजनक दावाही कदम यांनी केला … Read more

शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळ यांनी केली मोठी घोषणा

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असतानाच त्यांनी स्वतः एक महत्वाची घोषणा केली आहे. भुजबळ सध्या त्यांच्या येवला मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तसेच त्यांनी लोकसंपर्क वाढवला असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र त्यांनी राबवले आहे. अशात त्यांनी विधानसभा निववडणुकीच्या दृष्टीने महत्वाची घोषणा केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील … Read more

खा. उदयनराजे भोसले आणि राजु शेट्टी बैठक संपन्न

सातारा प्रतिनिधी | ‘विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जावु नका’ अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजे यांना केली. राजू शेट्टी हे खा. उद्यनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी सातारा इथं गेले असता चर्चेदरम्यान शेट्टी यांनी उदयनराजेंना ही विनंती केली. याबाबत बोलत असताना उदयनराजे म्हणाले की, ‘भाजपात प्रवेश करायचा की … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

सोलापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार असे संकेत मिळत आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याच्या हालचाली दिसून येत आहेत. हर्षवर्धन पाटलांनी आज बुधवार दि. ४ रोजी अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद … Read more

उस्मानाबाद काँग्रेसला मोठे खिंडार, जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांचा शिवसेनेत प्रवेश

उस्मानाबाद प्रतिनिधी| अनेक नेत्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग-आउटगोइंगचे उस्मानबाद जिल्ह्यात पण पाहायला मिळाले. राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्याचा प्रत्यय म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. या सर्वांनी राजीनामे दिल्यानंतर हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत … Read more