कोरोना आर्थिक संकट: कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारला पुन्हा घ्यावे लागणार मोठं कर्ज

मुंबई । कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने महसूल आटल्याने राज्य सरकारला आता आर्थिक चणचण भासू लागली आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. सरकारने यापूर्वीच विकासकामांवरील खर्चात ६७ टक्के कपात करुन आर्थिक ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, उत्पन्नाचे स्रोतच आटल्याने वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी सरकारला जवळपास ९ … Read more

सातारा जिल्ह्यात आज १८ नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५९७ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हयातील अठरा जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला होता. या पुरुषाचा मृत्यु पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना … Read more

२४ तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक १२३ मृत्यूंची नोंद 

वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच पण आज गेल्या २४ तासात राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंदही झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत मात्र तेवढेच रुग्ण बरेही होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आज राज्यात १२३ हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा पाहण्यात आला आहे. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने आज जाहीर … Read more

महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, … Read more

आता खासगी कार्यालयेही सुरु होणार; राज्य सरकारने दिली परवानगी

मुंबई । लॉकडाउनमधून शिथीलता देण्यास आता सुरुवात करण्यात आली असून राज्य सरकारने खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशात खासगी कार्यालयं १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी याच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असं सांगण्यात आलं आहे. ८ जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. या आदेशानुसार … Read more

शेतकर्‍यांनो काळजी करु नका! टोळधाडीवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण येथूनआलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी महाराष्ट्रात अनेक भागात पिकांवर संकट बनून  थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नागपूर येथे आता कृषिविभागाने या टोळधाडींवर ड्रोनद्वारे नियंत्रण करण्याचा पहिलाच प्रयत्न केला … Read more

पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला – संजय राऊत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  गेले अनेक दिवस देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्या, कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोना उपचार, कोरोनासंबंधी राजकीय लोकांचे आरोप-प्रत्यारोप, कोरोना बचावासाठीचे उपाय, दक्षता असे अनेक विषय माध्यमांमधून झळकत आहेत. टीव्ही लावला असता टीव्ही वर सतत कोरोनाचे अपडेट्स दिले जात आहेत. आज मात्र या बातम्यांची जागा ‘निसर्ग’ चक्रीवादळाने घेतली आहे. सकाळपासून टीव्हीवर … Read more

सोलापूरच्या महापौरांना कोरोनाची लागण 

सोलापूर । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. सोलापूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आता सोलापूरच्या महापौर आणि त्यांच्या पतीलाही कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. या दोघा पती पत्नीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही माहिती समजताच जिल्ह्यात गोंधळ उडाला आहे. सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आणखी ४० रुग्ण वाढले आहेत. अशातच या पती पत्नींना कोरोनाची लागण … Read more