गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे … Read more

खूषखबर! कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नवे कर्ज 

मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची … Read more

दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे राज्यभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. राज्यासह परभणी जिल्ह्यातही ही बस सेवा पूर्णपणे बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यावर आता जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे महामंडळाचे आदेश आल्यानंतर, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये जिंतूर , मानवत … Read more

भारतीय लष्करही म्हणतंय संपूर्ण जगाला पोलिसांचा अभिमान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही आपत्ती आली की सुरक्षेसाठी सर्वप्रथम उभा राहणारा घटक म्हणजे पोलीस होय. कोणत्याही सार्वजानिक उत्सवाच्या वेळी, राष्ट्रीय सणाच्या वेळी आपले कुटुंब, आपला आनंद सारे काही बाजूला ठेवून ते बंदोबस्तात उभे असतात. नागरिकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारा सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य  पाळणारा हा वर्ग Covid -१९ च्या लढाईत सुरुवातीपासून ढाल बनून उभा आहे. तेलंगणाचे आयपीएस महेश … Read more

लक्ष्मी रोडवर वर्दळ सुरु झाली आता तुळशीबाग केव्हा उघडणार ? 

पुणे । पुणे शहर म्हंटल्यावर डोळ्यासमोर काही ठिकाणे येतात. सारसबाग, लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग ही सर्वप्रथम नजरेसमोर येणारी ठिकाणे आहेत. कुठूनही आलेला मनुष्य एकदातरी या ठिकाणांना भेट देतोच. ही ठिकाणे प्रसिद्ध आहेतच पण नेहमीच वर्दळीखाली असणारी आहेत. मात्र संचारबंदीमुळे ही गर्दीची ठिकाणे शांत झाली होती. नेहमी लोकांनी गजबजलेले हे रस्ते सुमसान भासत होते. मात्र दोन … Read more

पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार

पुणे । गणेशोत्सव तसा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा उत्सव आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. गणेशोत्सवातील पुण्याचा झगमगाट न्याराच असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात प्रसिद्ध असणारा पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात … Read more

पुण्यातील ‘हि’ महाविद्यालये १ जून पासूनच होणार सुरु

पुणे प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी २ महिन्यापासून संचारबंदी सुरु आहे. विषाणूचा वाढत संसर्ग पाहता यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ ऑगस्ट पासून करण्याचे नियोजन होते. मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या संस्थेची सर्व महाविद्यालये १ जून पासून सुरु करण्याचे ठरविले आहे. महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असून नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाची सुरुवात बुधवारपासून झाली असल्याची  माहिती सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी … Read more

लॉकडाऊनमध्ये अनुष्का शर्माच्या घरात घुसला डायनोसॉर; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात बहुतेक लोक आपापल्या घरातच कैद झालेले आहेत. या अशा लॉकडाऊनच्या काळात मात्र बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरात ‘डायनासोर’ शिरला. या अभिनेत्रीने डायनासोरचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. आता आपण विचार करत असाल की हे असे … Read more

अखेर ६० दिवसांनंतर सलमानने घेतली आई वडिलांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातच कैद आहे. कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. परंतु असेही काही लोक आहेत जे आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान देखील आहे जो आपल्या आईवडिलांपासून दूर पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसमध्ये राहतो आहे. सुमारे ६० दिवसानंतर, सलमान … Read more

‘ही’ आहेत राज्यातील ‘रेड झोन’; लॉकडाऊनच्या नवीन नियमावलीनुसार ‘या’ सुविधा होणार येथे सुरू

मुंबई । सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु झाला आहे. पहिल्या ३ लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे राज्यात एकूण तीन झोनमध्ये कोरोनाबाधित क्षेत्रांची विभागणी … Read more