कमीत कमी जागेत शरद पवारांनी चमत्कार घडवला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : शरद पवार जसे कमीतकमी जागेत शेतकऱ्यांना उत्पादन घ्यायला शिकवतात तसेच त्यांनी कमीतकमी जागेत सरकार स्थापन करण्याचा चमत्कार घडवला, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, … Read more

शरद पवारांनी आम्हाला प्रेरणा दिली – हेमंत सोरेन

मुंबई : शरद पवार यांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली असं मत झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे होणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केले आहे. झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून सत्ताधारी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयाचे नायक झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन … Read more

राज्यपाल गयारामच, महाराष्ट्र चालवणं म्हणजे पोरखेळ नाही – उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यात घडत असलेल्या घडामोडींचा धावता आढावा घेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेल्या वेळेतच शिवसेनेला बसवण्यात आलं. भाजपने असमर्थता दर्शवण्यासाठी वेळ घेतला असल्याची टीका करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आम्ही सोमवारी पहिल्यांदाच अधिकृत चर्चा केली आहे. काँग्रेसने हे स्वतःहून सांगितल्यामुळे भाजपच्या आरोपांना आता उत्तर मिळालं असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले.

राज्यातील सत्तास्थापनेवरची ‘साडेसाती’ संध्याकाळी संपेल?

राज्यातील सत्ताकोंडी संध्याकाळी फुटण्याचे संकेत आता मिळत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संध्याकाळी ७.३० वाजता महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत भाजप सत्तास्थापनेसाठीचीआपली भूमिका स्पष्ट करू अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली.

राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता, शरद पवारांशी माझी चर्चा – पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही, शिवसेना मुख्यमंत्री मिळण्याच्या अटीवर ठाम आहे, राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसण्यावर ठाम आहे अशा परिस्थितीत काँग्रेसची भूमिका काय? हे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर आज प्रतिक्रिया दिली.

आम्हाला आमचं वास्तव माहित आहे, राष्ट्रवादी स्वप्नरंजनात नाही – जयंत पाटील

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत बसतांना आपल्या अटींवर कायम असून राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत शिवसेना इतर पर्यायांचा विचार करू शकते असे संजय राऊत वारंवार सां

लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ !! धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार?

निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.

धक्कादायक !! गडचिरोलीत काँग्रेसच्या नेत्याकडून अपक्ष उमेदवाराचे अपहरण

यानंतर आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर दहा जणांवर ३६५ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.