पूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार ?

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत तेली समाजाच्या नाराजीला भाजपला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘शेकाप’च्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्तपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ांत आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात चार आमदारांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादी मधील दत्तात्रय भरणे विरोधक गटाचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेल्या गटाने थेट भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा पाठिंबा देणाऱ्यांत समावेश असल्याने राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या पाच वर्षांत जगदाळे यांनीच हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील तालुका खरेदी विक्री संघासह कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती.

कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

बंडखोर भाजप आमदाराने काढली आक्रोश रॅली, तिकीट वाटपात दलाली झाल्याचा केला आरोप

उदगीर विधानसभा मतदारसंघातून तब्बल दोन वेळा निवडून आलेल्या आमदार भालेराव यांचा पत्ता भाजपनं कापल्यानंतर चिडून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच आपले अस्तित्व नमूद करण्यासाठी पहिल्यांदाच भालेरावांनी उदगीर शहरात आक्रोश रॅली काढत आपलं आव्हान कायम असल्याचं सांगितलं.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

मुंबई प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा ते स्वगृही परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने आता राष्ट्रवादीसमोर घोडा यांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान असणार … Read more

अशोक चव्हाण यांनी तावडेंच्या सल्ल्याचा काढला वचपा; तिकीट कापण्यावर केले मिश्किल ट्विट

नांदेड प्रतिनिधी। राजकारणात कोणाचे दिवस कसे फिरतील काही सांगत येत नाही. भाजपने विनोद तावडे यांचे तिकीट कापले जाणे हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. त्यातच तावडेंनी नांदेड दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच बहुमत देणार आहे तेव्हा अशोक चव्हाण यांनी झाकली मूठ सवा लाखाची, यानुसार निवडणूक … Read more

‘या’ १८ आमदारांना भाजपनेच नाकारले; पक्षांतर्गत विरोधक कमी करण्यात फडणवीसांना यश

मुंबई प्रतिनिधी | २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपात भाजपकडून तब्बल १८ विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यातील अनेकजण हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षामध्ये सक्रिय राहिले आहेत. निष्ठवंतांना डावलून आयारामांना किंवा डावलण्यात आलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तिकिट देण्यात आले आहे. नाराज विद्यमान आमदारांपैकी काही जणांनी बंडखोरी केली असून काहींनी पक्षनिष्ठ राहण्यावरच भर … Read more

जागावाटपात ‘स्वाभिमानी’ला ५ जागा, शिरोळमधून राजू शेट्टी की सावकार मादनाईक?

कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसह राज्यातील पाच जागा मिळाल्या आहेत. यामुळे इच्छुकांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. शिरोळ मधून सावकर मादनाईकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर ऐन वेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची … Read more

अहेरीत भाजपकडून पुन्हा अंबरीश आत्रामच; ग्रामसभेचा उमेदवार निर्णायक भूमिका बजावणार

गडचिरोली प्रतिनिधी। भाजपाच्या पहिल्याच उमेदवार यादीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दोन्ही विद्यमान आमदारांना जाहिर करण्यात आली होती. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचा या यादीत समावेश नव्हता. यामुळे अहिरीचे विद्यमान आमदार राजे अम्ब्रीश आत्राम यांचा पत्ता कट होणार की काय अशी अशी शंका आत्राम समर्थकांना वाटत होती. शेवटी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत … Read more