पश्चिम बंगाल मध्ये रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणास परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरात सुरु असणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. उद्योगधंद्यांसोबत मालिका, रिऍलिटी शोच्या चित्रीकरणाला देखील बंदी कऱण्यात आली होती. आता ठिकठिकाणी मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. राज्यांनी आता चित्रीकरणास सुरुवात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मालिकांचे जुने भाग न लागता नवीन भाग लागणार आहेत. पश्चिम बंगालमध्येही आता रिऍलिटी … Read more

बिनकामाचा, बोलघेवडा राष्ट्रसेवक परत आलाय; नुसरत जहाँची अमित शहांवर सडकून टीका

पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या कोणत्याच योजना राबविल्या जात नाहीत असा आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना चांगलाच राग आल्याचे दिसून आले. त्यांनी अमित शहा यांना यावर सडकून उत्तर देत काहीही काम न करता, केवळ बोलणारा कैवारी परत आला आहे असे विधान केले. 

अमित शहांच्या व्हर्च्य्युअल रॅलीवर ममता दीदी म्हणाल्या, ‘हे’ फक्त भाजपलाच परवडू शकत!

कोलकाता । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्य्युअल रॅलीसाठी ७० हजार एलईडी स्क्रीन वापरण्यात आल्याचे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. हे फक्त भारतीय जनता पक्षालाच परवडू शकते असा टोला ममता दीदींनी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाला लगावला आहे. त्या पुढे म्हणाल्या, ३० जूनपर्यंत लॉकडाउनची अंमलबजावणी केली जाईल. यासह, … Read more

ममता दीदींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमध्ये १ जूनपासून धार्मिक स्थळं होणार खुली

कोलकाता । येत्या 31 मे रोजी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, देशातील कोरोनाग्रस्तांचे वाढत प्रमाण पाहता लॉकडाऊन आणखी काही आठवडे वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी पश्चिम बंगालमध्ये 1 जूनपासून सर्व धार्मिक स्थळं खुली केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. … Read more

नुकसान १ लाख कोटींचं मदत १ हजार कोटींची; मोदींच्या पॅकेजवर ममता संतापल्या

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान महाचक्रीवादळानं प्रचंड तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचं सांगत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवरचा आपला राग व्यक्त केला. अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा झेललेल्या पश्चिम बंगालची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या … Read more

पंतप्रधान मोदी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी पश्चिम बंगाल-ओडिशा दौऱ्यावर

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे बंगालचं झालेलं नुकसान पाहण्याचं आव्हान पंतप्रधान मोदींना दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधान आज कोलकाता येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल धनकर कोलकाता विमानतळावर उपस्थित झाले … Read more

अम्फान वादळाचा पश्चिम बंगालला जबरदस्त तडाखा; आतापर्यंत ७२ जणांच्या मृत्यूची नोंद

वृत्तसंस्था । बुधवारी पश्चिम बंगालला धडकलेल्या अम्फान चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा पश्चिम बंगाल राज्याला बसला आहे. राज्यात अम्फान चक्रीवदाळामुळे आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यूची नोंद झाल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही ममता बॅनर्जी … Read more

.. म्हणून अमित शहांनी केला ममता बॅनर्जींना तातडीनं फोन

नवी दिल्ली । अम्फान या वादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नौदल आणि भारतीय सैन्यही अलर्टवर आहे. नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी … Read more

कोरोना संकट काळात तरी राजकारण करणं थांबवा! ममता बॅनर्जींची मोदींना विनंती

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे असंही स्पष्टपणे सांगितलं. केंद्र सरकारने कोरोनासारख्या इतक्या कठीण काळात राजकारण करणं थांबवावं अशी मागणी पंतप्रधान मोदींसोबत आयोजित बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केली. ममता बॅनर्जी यांनी बैठकीत … Read more

अहमदाबाद सील; भाजपने केरळ, दिल्ली सरकारला मागितली मदत..हे कसले गुजरात माॅडेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या सहा दिवसांत गुजरातमध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू हे गेल्या सहा दिवसांतील आहेत.त्यामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ही ६ मे रोजी ३९६ वर पोहचली आहे अशातच केंद्र सरकार आणि माध्यमांचे लक्ष हे सातत्याने बंगालवर केंद्रित झाले होते. जर आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्ही … Read more