मराठा समाजाला यावर्षी आरक्षण मिळणार कि नाही यावर सुप्रीम कोर्ट १५ जुलैला निर्णय घेणार

नवी दिल्ली । मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही, याबाबत सुप्रीम कोर्ट येत्या १५ जुलैला निर्णय घेणार आहे. सुप्रीम कोर्ट पुढील बुधवारी यावर्षी मराठा समाजाला कोटा लागू करण्यासाठी अंतरिम दिलासा देण्याबाबत आदेश देणार आहे. राज्यात शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समुदायाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण कायम राखणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल … Read more

‘सारथी’ला बंद करून दाखवाच! मग बघतो; नितेश राणेंचा मंत्र्याला धमकीवजा इशारा

मुंबई । सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात भाजप आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. सारथी संस्था बंद केल्यास राज्यातील मंत्र्यांना नव्या गाडीतून महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा धमकीवजा इशारा राणे यांनी दिला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. राणे यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार … Read more

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने मांडले ‘हे’ मत

मुंबई | मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयाने मत मांडले आहे. न्यायलय योग्यरित्या सुरु झाल्यास आपण मराठा आरक्षणावर निकाल देऊ असं न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. व्हिसी द्वारे निकाल देऊ शकत नाही असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयातील आजची मराठा आरक्षणा संदर्भातील सुनावणी संपली असून अंतरिम आदेशासाठी १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय … Read more

मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका- खा. छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर । मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, अशा शब्दात भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना त्यांचं नाव न घेता सुनावले आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी यांनी ट्विट करून सारथी संस्थेच्या वादावर भाष्य केलं आहे. … Read more

मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर

मुंबई । मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल, असे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले. … Read more

मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान शरद पवारांचा उल्लेख केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १७ मार्चला सुरू होणार आहे. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केल्यानं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं. … Read more

मराठा आरक्षणावेळी दाखल झालेले युवकांवरील गुन्हे मागे घ्या- आमदार शंभूराज देसाई

मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या दंगली प्रकरणी युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली होती. या प्रकरणात मराठा युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने त्यांना त्रास होत आहे. ते गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई आता पुढे सरसावले आहेत

मराठा आरक्षणा विरोधात याचिका टाकणाऱ्या सदावर्तें यांच्यावर उच्च न्यायालयासमोर हल्ला

Gunaratna Sadavarte

मुंबई | मराठा आरक्षणा विरोधात याचिका टाकणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज मुंबई उच्च न्यायालया बाहेर हल्ला झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या नंतर सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका टाकल्याच्या कारणाने त्यांचायवर हल्ला केला. हल्ला करणारे कार्यकर्ते हे एक मराठा लाख मराठा घोषणा देत होते. हाती आलेल्या माहितीनुसार, एड. सदारत्ने मुंबई उच्च न्यायालयात आले असता त्यांच्यावर हा … Read more

आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारला भिमा कोरेगाव सारखी भांडणे लावायची आहेत – धनंजय मुंडे

Dhananjay Mundhe on Maratha Resrvation

मुंबई | सरकारच्या मनात आरक्षण देण्याविषयी पाप आहे. पाप नसते तर अहवाल तातडीने सभागृहात ठेवला असता, असे म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले. आरक्षणाच्या मुद्यावर सरकारला दोन समाजांत भीमा कोरेगावसारखी भांडणे लावायची आहेत, असा आरोपही यावेळी मुंढे यांनी लगावला आहे. धनगर, मुस्लिम समाजाला या सरकारने वा-यावर सोडले आहे. रागारागाने त्वेषाने … Read more

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नाही हा तर विरोधकांचा कांगावा – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई | मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर असताना मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही असा सूर विरोधकांचा असून तो केवळ कांगावा आहे असं चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुस्लिम समाजात बागवान , खाटीक, तांबोळी अशा अनेक ४२ जाती असून त्यांना आज मिळत आहे परंतु अजून काही आरक्षणापासून वंचित जातींचा अभ्यास करून आम्ही त्या जातींना ओबीसी प्रवर्गात … Read more