काँग्रेसच्या मुस्लिम महाराष्ट्र कार्यध्यक्षाच्या भावाने केला भाजपमध्ये प्रवेश

मीरा भाईंदर प्रतिनिधी | काँग्रेसचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा भाऊ समाजसेवक सय्यद मूनव्वर हुसेन यांनी व त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मिरा भाईंदर मधील मुझफ्फर हुसेन हे काँग्रेसचे जुने जाणते नेते असून ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत. तसेच आता एक महिन्यापूर्वीच काँगेस पक्ष … Read more

काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचा हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळतीचे ग्रहण लागलेले असतानाच आता अब्दुल सत्तार यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील काही दिवसापासून अब्दुल सत्ता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येत असतानाच सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला नक्कीच धक्का बसला असणार हे मात्र निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या अब्दुल सत्तार … Read more

युतीची घोषणा होण्याआधीच चंद्रकांत पाटलांनी केली चार उमेदवारांच्या नावाची घोषणा

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना भाजपने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करून टाकली आहे. युती होवो अथवा न होवो वाईतून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, दक्षिण कराड मतदार संघातून अतुल भोसले आणि कराड उत्तरमधून मनोज घोरपडे हे भाजपचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. … Read more

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे दोन बडे नेते विधानसभा निवडणूक लढवण्यास झाले अपात्र

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन या दोघांना घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावर शनिवारी धुळे सत्र न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली. देवकरांना ५ वर्षांची तर सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच प्रमाणे त्यांना १०० कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. दोघांनी केलेला … Read more

हर्षवर्धन पाटील ही भाजपमध्ये जाणार ; बुधवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठरवणार पुढील दिशा

इंदापूर प्रतिनिधी | काँग्रेस नेते तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आगामी विधानसभा भाजपमधून लढवावी असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करून पुढील राजकीय दिशा ठरवण्याचा निर्धार केला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी इंदापूरची जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही. त्यामुळे पाटील यांचे मन भाजपकडे वळले आहे अशी चर्चा सध्या … Read more

आदित्य ठाकरे वरळीमधून विधानसभा लढणार ; शिवसेनेच्या या नेत्याने कार्यकर्त्यांमध्ये केली घोषणा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्षाचे प्रमुख असणारे ठाकरे कुटूंब निवडणुक लढण्यापासून दूर का राहते असा प्रश्न नेहमीच राजकरणात विचारला जातो. त्या प्रश्नाचे उत्तर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या रूपाने देणार आहे. कारण आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार आहे आता निश्चितच मानले आहे. या संदर्भात वरळी येथील शिसैनिकांच्या मेळाव्यात घोषणा देखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. … Read more

उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित, पुढील आठवड्यात करणार प्रवेश : चंद्रकांत पाटील

सातारा प्रतिनिधी | उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझा कसलाही विरोध नाही. अथवा मी कसलाही खोडा घालत नाही. उदयनराजे पुढील आठवड्यात दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश करतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजेंच्या प्रवेशाबाबत मी त्यांच्याशी काल बोललो असून ते येत्या आठवड्यात दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील असे … Read more

घरकुल घोटाळ्यात शिवसेनेचे जैन आणि राष्ट्रवादीचे देवकर दोषी ; दोघांसह ४८ जणांना ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे निर्देश

धुळे प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर घरकुल घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह ४८ जणांना ताब्यात घेण्याचे निर्देश धुळे सत्र न्यायालयाने दिले आहेत. तसेच कोणत्याही क्षणी न्यायालय या प्रकरणी शिक्षेची सुनावणी करू शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर या … Read more

शरद पवारांच्या चिडण्यावर सुप्रिया सुळे म्हणतात

नवी मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या प्रकार बद्दल सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवार यांच्या चिडण्यावर सर्वच मीडियात चर्चा सुरु असतानाच सुप्रिया सुळे यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवारांना आपण याआधी एवढे चिडलेले कधीच पाहिले नव्हते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. शरद पवारांच्या कन्या … Read more

गणेश नाईक यांचे घर राष्ट्रवादी फोडणार ; संजीव नाईक राष्ट्र्वादीतच राहण्याची शक्यता?

नवी मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच प्रमाणे काही दिवसातच गणेश नैखे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशातच गणेश नाईक यांचे दुसरे पुत्र माजी खासदार संजीव नाईक हे राष्ट्र्वादीतच राहणार असल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे. ताईशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्त सुप्रिया सुळे या … Read more