माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीची छापेमारी; राजकीय क्षेत्रात खळबळ

ed khotkar

औरंगाबाद – माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी ईडीने (सक्तवसुली संचलनायलय) छापेमारी केली आहे. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ईडीकडून तपासणीही करण्यात आली आहे. 12 जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. ईडीने केलेल्या या छापेमारीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या … Read more

‘आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; उद्विग्न शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

farmers

हिंगोली – अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे रब्बी हंगाम तरी साथ देईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र महावितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरू अर्धे बिल भरूनही वीज तोडणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोड्याच्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे नक्षलवादी होण्याची परवानगी मागितली आहे. या वर्षी सेनगाव तालुक्यात … Read more

मराठवाड्यातील 23 नगरपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले 

औरंगाबाद – राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी काल राज्यातील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. यात मराठवाड्यातील 23 नगर पंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचायतीने साठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार असून संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवणार या उमेदवारांना नामनिर्देशन … Read more

धक्कादायक ! डोक्यात फरशी घालत जावयाने केला सासूचा खून; चाकूनेही केले वार

murder

जालना – पत्नी, मुलांना सोबत पाठवित नसल्याचा राग मनात धरून जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून व चाकूने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर भागात घडली. सखुबाई बिरजूलाल काळे (75, रा. मार्बल पॅलेस, प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर, जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात मयत महिलेची मुलगी ज्योती … Read more

लसीकरणाचा टक्का घसरला ! जिल्हाधिकारी व सीईओंना विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जि. प. सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागील 11 महिन्यांपासून पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे असताना विभागातील सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे विभागीय आयुक्तांनी काल विभागाचा आढावा घेतला. त्यात मराठवाडा विभाग पिछाडीवर … Read more

रस्ता एक भूमिपूजन अनेक !

road

औरंगाबाद – शहरातील गारखेडा परिसरातील बाळकृष्णनगर- विजय नगरातील शिवनेरी चौकापर्यंत चा रस्त्याचे मागील सहा वर्षात तब्बल चार वेळा भूमिपूजन झाले. परंतु, अद्यापही रस्त्याचे काम मात्र सुरू झालेले नाही. या एकाच रस्त्याच्या कामासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय व्यासपीठावरून अनेक बाता झोडल्या. काल देखील राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा … Read more

मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी संकटात

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले तरीही म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली असून, काढणीला आलेला कापूस हातात येईल की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती … Read more

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकाला दिलासा

Raina

औरंगाबाद – मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना विशेषतः हरभरा या पिकांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर काल सायंकाळी शहरातही पावसाचा शिडकावा झाला. तसेच औरंगाबादसह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज, माजलगाव … Read more

NCB पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई तब्बल 1127 किलो गांजा जप्त

ncb

नांदेड – मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणाचं विशाखापट्टणम कनेक्शन समोर आल आहे. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या 3 हजार किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन आढळले होते. एनसीबीने … Read more