व्यावसायिकांसाठी चांगली बातमी ! वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढविली, आता नवीन डेडलाइन काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 (FY 2019-20) साठी वार्षिक जीएसटी रिटर्न (Annual GST Return) भरण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याचा वार्षिक कालावधी 31 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविला होता, म्हणजेच केंद्राने व्यापाऱ्यांना दुसर्‍यांदा रिटर्न भरण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. अर्थ मंत्रालयाने … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमध्ये सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा! धर्मेंद्र प्रधान म्हणाले,”एप्रिल 2021 पासून किंमती कमी होऊ शकतील”*

वाराणसी । देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) प्रचंड वाढत आहेत. तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याच वेळी लोकही प्रश्न विचारत आहेत की, याच्या किंमती कधी कमी होईल. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत निवेदन दिले आहे. प्रधान म्हणाले की,”पेट्रोलियम उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे जेणेकरुन भारतीय … Read more

Q3 GDP DATA: अर्थव्यवस्थेबाबत समोर आली चांगली बातमी, तिसर्‍या तिमाहीत जीडीपीमध्ये झाली 0.4% वाढ

नवी दिल्ली । या आर्थिक वर्षाच्या (2020-21) डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पाद (GDP) डेटा शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था चांगली वाढली आहे. तिसऱ्या तिमाहीत जीडीपीची वाढ 0.4 टक्के आहे. मागील दोन तिमाहीत कोरोना विषाणूच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणात घट नोंदविण्यात आली. दुसऱ्या तिमाहीत 7.5 टक्के घट … Read more

जगातील सर्वात उंच रेल्वे पुल लवकरच बनून तयार होणार, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची माहिती

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे काम जवळपास पूर्णत्वाला आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भामध्ये ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ब्रिजला इन्फ्रास्ट्रक्चरचा अप्रतिम नमुना असल्याचे बोलले आहे. सोबतच, या पुलाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. चिनाब नदीवर बनत असलेला हा रेल्वे पूल 476 मीटर लांब आहे. इंद्रधनुष्याच्या आकाराचा हा … Read more

घरातील कामे करणे ही फक्त पत्नीची जबाबदारी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई | पती म्हणजे एका पत्नीचे सर्वस्व! त्याला खुश ठेवण्यासाठी पत्नीचा जन्म असतो, असे आपली पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये शिकवले जाते. यामुळे पत्नीने पतीचे सर्व कामे करणे बंधनकारक आणि कर्तव्ये समजून करणे बंधनकारक असल्याचे समाजामध्ये रूढ झाले असल्याचे पाहायला मिळते. अश्यातच एखाद्या पत्नीने, पतीने सांगितलेले काम करणे नाकारले तर पती कुठल्याही थराला जाऊ शकतो. पत्नीने चहा … Read more

यावर्षी देशात होणार धान्याचे विक्रमी उत्पादन, मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन 2% वाढेल

नवी दिल्ली । यावर्षी म्हणजेच सन 2020-21 मध्ये धान्य उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तांदूळ, गहू, डाळी आणि इतर धान्यांचे 303.34 मिलियन टन उत्पादन आतापर्यंत विक्रमी पातळीवर राहील. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात ही वाढ दिसून येत आहे. याबाबत कृषी मंत्रालयाने माहिती दिली आहे. जुलै ते जून या कालावधीत पिकांचे … Read more

हिटलरने देखील स्टेडियम बांधून स्वतःचे नाव दिले होते; जितेंद्र आव्हाडांचा मोदींना टोला

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने देखील सत्तेत आल्यानंतर मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं, मोदींनी सुद्धा स्वतःच नाव दिलं हे पाहून मला त्याचीच आठवण आली, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे … Read more

निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकार अकार्यक्षम; अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीएसटी चे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध विकासकामे करण्याची आवश्यकता होती, परंतु २०२० – २१ या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद एकूण तरतुदीपैकी केवळ ४५ टक्के निधी खर्च केला असून त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरीत निधीच्या केवळ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगीकरणावर म्हणाले की,”सरकारचे काम बिझनेस करणे नाही”

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, सरकारला व्यवसाय करण्यात कोणताही रस नाही. लोकांचे कल्याण आणि विकासाशी संबंधित प्रकल्पांवर सरकारचे लक्ष असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांवर ते एका वेबिनारमध्ये बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की,”सरकारने हा व्यवसाय स्वत: चालविला पाहिजे, त्याचे मालक बनले … Read more

लॅपटॉप, टॅब्लेट आणि पीसी तयार करण्यासाठी PLI योजनेस मंत्रिमंडळाने दिली मान्यता

नवी दिल्ली । लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी आणि सर्व्हरच्या उत्पादनास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड प्रोत्साहन PLI (Production Linked Incentive) योजनेस मान्यता दिली आहे. या PLI योजनेद्वारे देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. या हाय-टेक आयटी हार्डवेअर गॅझेटसाठी पीएलआय योजना मंजूर होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात दूरसंचार उपकरणे तयार करण्यासाठी 12,195 … Read more