जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’

नवी दिल्ली : देशातील पहिले’चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’ (सीडीएस) यांचे नाव जाहीर झाले आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस म्हणून पदभार स्वीकारतील. सीडीएसला तीन सैन्यात ताळमेळ निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात येईल. मंगळवारी जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होणार आहेत. सीडीएस हा एक फोर स्टार जनरल असेल आणि त्याचा कार्यकाळ तीन … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे भाडे सरकारने थकवले !

देश विदेशामध्ये प्रवास करण्यासाठी नेत्यांना ‘एअर इंडिया’ तर्फे सेवा पुरवली जाते. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र आता सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात मित्रपक्षातील नेत्यांना मिळणार स्थान? मोठा फेरबदल होण्याची शक्यता

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात. नव्या चेहऱ्यांमध्ये अधिकतर भाजपच्या मित्र पक्षातील नेत्यांना संधी मिळू शकते. मोदींनी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपमधील नेत्यांना अधिक संधी दिली होती. यात जेडीयू सारख्या पक्षातील एकही नेत्याचा समावेश नव्हता. याशिवाय शिवसेने सारख्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला केवळ प्रतिकात्मक प्रतिनिधित्व मिळाले होते.

कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे. राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते.

भाजप सरकार हे धनदांडग्याचं; वनजमीन हडपण्याचा सरकारचा डाव – सीताराम येचुरी

शहापूर विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कृष्णा भवर यांच्या प्रचारार्थ मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मा. खासदार सिताराम येचुरी यांची प्रमुख उपस्थिती होती

खुशखबर ! तुमचा हारवलेला मोबाईल फोन मोदी सरकार शोधून देणार

मुंबई प्रतिनिधी | मोबाईल चोरीला गेल्याने होणार मनस्ताप तुम्ही सोसला असेल मात्र आता तो मनस्ताप तुम्हाला आता भोगावा लागणार नाही. कारण मोदी सरकारने लोकउपयोगी निर्णय घेतला आहे. तुमचा चोरीला गेलेला मोबाईल आता केंद्रीय दूरसंचार विभाग शोधून देणार आहे. या योजनेचा शुभारंभ आज मुंबई येथे रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागा मार्फत देशभरात … Read more

कलम 370 प्रकरणी मोदी सरकारला झटका

टीम, HELLO महाराष्ट्र | जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात पाच सदस्यांचे खंडपीठ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करणार आहे. यासोबतच न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधील मीडियाच्या स्वातंत्र्यासंदर्भातही केंद्रातील मोदी सरकारला नोटीस जारी केली आहे. तसंच या नोटीशीला सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष … Read more

खुशखबर ! आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार

नवी दिल्ली | आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार असल्याची संकल्पना देशात राबवली जाणार आहे. एक देश एक राशन या नावाने हि संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असे देखील सांगितले जात आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या लोकांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचाही लाभ घेता येणार आहे. या बाबत … Read more

या सरकारने आपल्याला भिकेला लावले : उदयनराजे भोसले

Untitled design

सातारा प्रतिनिधी |सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. नमाजाला भाषण रोखलं उदयनराजे भोसले यांचं भाषण सुरु झालं त्यावेळी दुपारचं नमाज … Read more