मोठी बातमी : युरिया अनुदानाची रक्कम सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार, सुरु होणार ‘ही’ नवीन योजना

नवी दिल्ली : युरियाच्या किंमतीवरील नियंत्रण काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सरकार युरियाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवू शकते. यूरियावरील सरकारी नियंत्रण काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खत-सबसिडी सिस्टम लागू करू शकते. सरकारी नियंत्रण हटवल्यानंतर युरियाचे दर प्रति बॅग 400 ते 445 रुपयांपर्यंत वाढतील. सध्या एका पोत्याच्या युरियाची किंमत 242 रुपये आहे. सध्या अनुदानाची … Read more

मोठी बातमी : ‘या’ तारखेला बँकांचा देशव्यापी संप; सलग तीन दिवस बँका बंद, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : पगारावरील वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर बँक युनियनने पुन्हा संप पुकारला आहे. इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) या महिन्यात सऱ्यांदा संप पुकारला आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या दिवशी बँका बंद राहतील. यापूर्वी याच महिन्यात 8 बँक कर्मचारी संघटना 8 जानेवारीच्या भारत बंदमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यादिवशी बहुतेक बँका बंद ठेवल्या गेल्या आणि त्याचा … Read more

आता रेल्वे स्थानकावर फ्री कॉलिंग तसेच मोबाईल,लॅपटॉप चार्जिंगची सुविधा; ‘या’ सुविधाही मिळणार, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : आपल्या प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकात एक अनोखी ह्यूमन इंटरएक्टिव इंटरफेस सिस्टम (मानवी संवाद साधणारी यंत्रणा) बसविली आहे. याद्वारे प्रवासी मोबाइल व व्हिडीओ कॉलिंग विनामूल्य करू शकतात. तसेच, आपण फॉस्ट मोबाइल चार्जिंग, हवामान आणि ट्रेनसह स्थानिक ठिकाणांबद्दल माहिती देखील मिळवू शकता. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबाबत माहिती … Read more

कराडचा ‘गलीबॉय’ नोमान खानच्या रॅपमधून मोदी सरकार धारेवर

मागील वर्षी आलेल्या गलीबॉय या चित्रपटाने अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीला खिळवून ठेवलं होतं. आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी धडपडणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांची गोष्ट गलीबॉयमध्ये समर्पकपणे दाखवण्यात आली होती. या चित्रपटानंतर देशभरात रॅप गाण्याची चलती दिसून येऊ लागली. वास्तव घडामोडींवर, देशातील बऱ्या-वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करून रॅप गाणं रचले जाऊ लागले. असाच एक प्रयत्न सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नोमान खान यांनी केला आहे.

पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आवाज उठवा; पंतप्रधान मोदींचे आंदोलन कर्त्यांना आवाहन

तुमकुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. तुमकुरु येथे श्री शिवकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी भाषण केले. ते म्हणाले की, जे लोक आज भारतीय संसदेविरोधात आंदोलन करीत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ही कारवाई उघडकीस आणण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर … Read more

आम्ही स्वतःला राजकारणापासून दूर ठेवतो, सरकारच्या आदेशानुसार काम करतो – बिपीन रावत

हॅलो महाराष्ट्र टीम : नवनियुक्त मुख्य संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी सांगितले की, सशस्त्र सेना स्वत: ला राजकारणापासून दूर ठेवते आणि सरकारच्या निर्देशानुसार काम करते. सशस्त्र दलाचे राजकारण केले जात असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले. जनरल रावत म्हणाले की, सीडीएस म्हणून त्यांचे लक्ष्य तिन्ही दलांतील समन्वयावर आणि संघाप्रमाणे कार्य करणे … Read more

370 कलम रद्द करणे हे जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणण्यासाठी उत्तम पाऊल – नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे

नवी दिल्ली : जनरल बिपीन रावत निवृत्त झाल्यानंतर आज नवे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. लष्करप्रमुख पदी रुजू झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी कलम 370 वर भाष्य केले. त्यांनी म्हंटले की, कलम 370 रद्द झाल्यानंतरच्या परिस्थितीत निश्चितच सुधारणा झाली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या दृष्टीने हे चांगले आहे. … Read more

राहुल गांधी हे फक्त मूर्खच नाहीत तर महामूर्ख आहेत; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

  चंदिगढ । भाजपचे वाचाळवीर नेते वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. या वाचाळवीर नेत्यांमध्ये आणखी एका भाजप नेत्याची भर पडली आहे. हरियाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजप खासदार नायब सिंह सैनी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी याच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख महामूर्ख असा केला आहे. जर कोणी महामूर्ख असेल तर ते राहुल … Read more

वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना बकरी सारखी झाली – रामदास आठवले

सातारा : वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना आता बकरी सारखी झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सातारा दौऱ्यावर असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी फार कठोर भूमिका घेतली होती. यावर मात्र शिवसेनेने तडजोडीची भूमिका घेतली आहे. सत्तेसाठी शिवसेना गुलामगिरी करत आहे. … Read more

#CAA_PROTEST, हिंसक आंदोलनामुळे रेल्वेचे 80 कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने जाळपोळीसारख्या घटना घडल्या आहेत. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम बंगाल, ईशान्यकडील काही राज्यात रेल्वेच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यांमुळे रेल्वेला जवळपास ८० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती … Read more