अमिताभ बच्चन यांचा मल्टीस्टारर चित्रपट ‘त्रिशूल’ ४२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता,या यातील काही न पाहिलेली छायाचित्रे पाहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्टीस्टारर सुपरहिट फिल्म त्रिशूलच्या रिलीजला आज ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत.हा चित्रपट ५ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार, वहीदा रहमान, हेमा मालिनी, शशी कपूर, प्रेम चोप्रा, राखी, सचिन पिळगावकर आणि असे अजूनही बरेच स्टार्स आहेत. या चित्रपटाची काही न पाहिलेली छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखणार … Read more

‘ती’च्या नकाराला सिरीयस न घेता, फालतु रोमँटिकपणा बॉलिवूड का दाखवतं??

त्रास देणं ही साधी कृती नाही, ही गुंतागुंतीची एक मानसिक प्रवृत्ती आहे, जी सामाजिक पैलू आणि घटकांमुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळेच फक्त त्रास देणारा व्यक्ती नाही तर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टीसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायला हवं.

छपाकमधील अ‍ॅसिड हल्लेखोराचे नाव बदलल्याने नेटिझन्सची दिपिकावर आगपाखड

रिलीजच्या काहीच दिवस आधी दीपिकाच्या ‘छपाक’ चित्रपटातील अ‍ॅसिड हल्लेखोराचे नाव बदलल्याच्या कथित बातमीवरून ट्विटरवर दीपिकावर नेटिझन्स नाराज झाल्याचे दिसत आहेत. छपाक हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यात जीव वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे.

सैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’चे नवे पोस्टर रिलीज…

जवानी जानमेन सिनेमाची निर्मिती जॅकी भगनानी करतो आहे. पोस्टर बघून सैफ अली खान यात प्लेबॉयची भूमिका साकारणार असल्याचा अंदाज लवण्यात येतो आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नितिन कक्कड करतोय. यात सैफ 40 वर्षांच्या व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. या सैफ सोबत तब्बू, पूदा बेदीची मुलगी आलिया दिसणार आहे. आलिया या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. ‘जवानी जानेमन’ या सिनेमात आलिया सैफच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जवानी जानेमन’चे शूटिंग सुरू होण्याअगोदर आलिया सैफ आणि सिनेमातील इतर कलाकारांसोबत वेळ घालवत आहे.

‘या’ हिंदी चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये होणार रिमेक…

हा चित्रपट आहे हृतिक रोशन अभिनित ‘सुपर 30’. गणिताचे प्राध्यापक आनंद कुमार यांच्या आयुष्यावरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस आणि समीक्षकांची पसंती मिळवली होती. आनंद कुमार यांच्या आयुष्यातील हे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हृतिक आणि निर्माता दिग्दर्शकांचं अभिनंदनही केलं होतं. या चित्रपटात हृतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत दिसला होता. तर मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठीही मुख्य भूमिकांमध्ये दिसले होते.

‘बालाकोट एअरस्ट्राईक’ वर लवकरच येणार चित्रपट, संजय लीला भन्साळी यांची घोषणा….

काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस मानला जात आहे. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने केलेल्या या भीषण हल्ल्यात जवळपास 40 सीआरपीएफ जवान मरण पावले आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला.

‘लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित…

बायोपिक म्हटलं की आपल्या समोर ऐतिहासिक किंवा अलीकडच्या काळातील मोठ्या व्यक्ती, नावाजलेले खेळाडू यांच्याच जीवनावर चित्रपट बनवले जातात. मात्र मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात खडतर संघर्ष करतात असे नाही. तर सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जातात.

‘पावनखिंड’ चित्रपटातून उलगडणार बाजीप्रभूंची शौर्यगाथा…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या लढवय्या आणि पराक्रमी मावळ्यावर आधारित ‘पावनखिंड’ हा चित्रपट लवकर येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री….

ही मराठीमोळी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून इरावती हर्षे आहे. इरावतीने आत्ता पर्यंत मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘शमशेर’ या चित्रपटात इरावती रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

मुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई लागली रडायला…

प्यार का पंचनामा या चित्रपटाद्वारे कार्तिकने त्याच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने एक किसिंग सीन दिला होता. पण सुरुवातीला या चित्रपटात किसिंग सीन द्यायला तो तयार नव्हता. त्याच्या कुटुंबियांना ही गोष्ट आवडणार नाही याची त्याला खात्री होती. पण अखेरीस भूमिकेची मागणी असल्याने त्याने किसिंग सीन देण्याचे ठरवले. बिस्कूट टिव्हीला 2013 ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने सांगितले होते की, प्यार का पंचनामा या चित्रपटाच्यावेळी स्क्रीनवर किसिंग सीन द्यायला मी तयार नव्हतो.