‘माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी। आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसंच “मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत … Read more

मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी |  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी आज मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका विस्ताराने मांडली आहे. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. महिनाभर मुंबईत … Read more

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर ; यादीत २२ जागांचा समावेश तर जातीचाही उल्लेख

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत देखील लोकसभा उमेदवारांच्या यादी प्रमाणे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर एमआयएम सोबत पुन्हा संधान नबंधता विधानसभेच्या सर्व जागा वंचित लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. एमआयएमने वंचित सोबत काडीमोड घेतल्यानंतर आपने वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वंचित … Read more

Breaking| शिवस्मारकाच्या कामात घोटाळा ; काँग्रेस राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई प्रतिनिधी | शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहार या बाबत कॅगच्या अधिकाऱ्याने तक्रार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे. स्मारकाची एक विट देखील नरचता स्मारकासाठी ८० कोटी रुपये खर्च कसे झाले. … Read more

युती बाबत मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून पुढील महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप 162 आणि शिवसेना 126 जागावर निवडणूक लढणार असल्याच्या वृत्तांचे मात्र त्यांनी फेटाळून लावले. दोन्ही पक्ष आघाडी करून निवडणूक लढणार … Read more

खुशखबर ! तुमचा हारवलेला मोबाईल फोन मोदी सरकार शोधून देणार

मुंबई प्रतिनिधी | मोबाईल चोरीला गेल्याने होणार मनस्ताप तुम्ही सोसला असेल मात्र आता तो मनस्ताप तुम्हाला आता भोगावा लागणार नाही. कारण मोदी सरकारने लोकउपयोगी निर्णय घेतला आहे. तुमचा चोरीला गेलेला मोबाईल आता केंद्रीय दूरसंचार विभाग शोधून देणार आहे. या योजनेचा शुभारंभ आज मुंबई येथे रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागा मार्फत देशभरात … Read more

मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे नेते पक्ष सोडून जाऊ लागल्याने व्यथित झाले आहेत. मात्र या राजकीय खेळीचा बदला घेण्यासाठी शरद पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शरद पवार स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करून लोकांना सरकराने अपयश दाखवून देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांना चितपट करण्यासाठी शरद पवार हे विधानसभेच्या मैदानात उतरले … Read more

सेना भाजपच्या मेगा भरतीमुळे युतीच्या जागावाटपात आला आहे हा नवा सस्पेन्स

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेत्यांची मेगा भरती भाजप आणि शिवसेनेने करून घेतली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीत परंपरेने लढवत असलेल्या जागांवर आता टाच आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेना भाजपच्या जागा वाटपात २० ते २५ जागांची अदला बदली होण्याची शक्यता आहे. युतीचे जागा वाटप ; बार्शीची जागा भाजपला सुटणार ; आमदार दिलीप सोपलांच्या … Read more

धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

मुंबई प्रतिनिधी | पुणे मुंबई एक्सप्रेसवर धनंजय  मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याने त्यांच्या अंग रक्षकाला इजा झाली आहे. तसेच धनंजय मुंडे अन्य गाडीत बसले असल्याने त्यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. हा अपघात आज रविवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास झाला आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला असताना लोणावळ्याजवळील … Read more

मुंबईकरांना दिलासा ; रेल्वेच्या तीनही मार्गावरील वाहतूक पूर्ववत

मुंबई प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये तीनही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक काल पासून ठप्प होती. लोकलचा बोजवारा उडल्याने हजारो मुंबईकर रेल्वे स्थानकांवर तसेच कार्यालयांमध्ये अडकून पडले होते. तसेच अतिवृष्टीमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आज सकाळ पासून रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक १५ ते … Read more