राजेशाही, लोकशाहीची घराणेशाही आणि सरंजामशाही..!!

राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रकाश पवार यांच्या मते महाराष्ट्रात ८९ घराणीच राजकारण करत आहेत. इतर कुठल्या नवीन व्यक्तीला यात स्थान मिळवणे खूपच अवघड आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारण हे फक्त जय आणि पराजय या चष्म्यातून बघितले जाते. एकंदरीत निवडणुकांतला वाढलेला खर्च, झालेले गुन्हेगारीकरण यामुळे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारालाच राजकीय पक्षही सहज जवळ करतात आणि लोकही सहज स्वीकारतात ही सत्यपरिस्थिती आहे.

आपलं अस्तीत्व टिकवण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड; भास्कर जाधवांची टीका

ठाकरे सरकार न म्हणता राज्यसरकार म्हणावं असा आक्षेप राणेंनी घेतला  होता. त्यावरून जाधव यांनी राणेंचा चांगलाच  समाचार घेतला आहे

‘नितेश ५० हजार मतांनी निवडून येणार ‘- नारायण राणे

विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. निवडणूक निकालापूर्वी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये निकालाची धाकधूक आहे तर, दुसरीकडे आमदारकीच्या या परीक्षेमध्ये कोण पास होणार कोण नापास होणार,हे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे निवडून येणार असल्याचं भाकितं केलं.

‘मी नम्रच आहे शिवसेनेनं त्याचा बोध घ्यावा’;नारायण राणेंची शिवसेनेपुढे शरणागती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे राणे यांनी स्पष्ट केल. असे असले तरी सिंधुदुर्गात लढत मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशीच होत आहे.

राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध

कणकवलीत भाजप सेनेची युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

नारायण राणेंना पक्ष विलीनीकरणाचा मुहूर्त मिळाला?

गेली अनेक दिवस भाजपात जाण्यासाठी नारायण राणे वाट पाहत आहेत. अखेर आपल्या स्वाभिमानी पक्षाचे विलीनीकरण करण्यासाठी राणेंना मुहूर्त मिळाला आहे. लवकरच राणेंच्या पक्षाचे भाजपात विलीनीकरण होणार आहे. या बहुप्रतीक्षित विलनीकरणाचे संकेत सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले.

युती २८८ नव्हे २८७ जागीच : भाजपच्या या उमेदवारा विरोधात शिवसेनेने दिला उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेनेत टोकाचे मतभेद असताना देखील शिवसेना भाजप युती झाली. युती झाल्यानंतर देखील शिवसेनेचे ज्या कुटुंबा सोबत हाड वैर आहे. अशा राणे कुटुंबातील उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात पदाधिकारी असणाऱ्या सतीश सावंत यांनाच शिवसेनेने पक्षात घेत नितेश राणे यांच्या विरोधात निवडणुकीला उतरवले आहे. सतीश सांवत हे नारायण राणे … Read more

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला दीपक केसरकारांचा अडथळा ; राणेंच्या मुलांवर शिवसैनिक नाराज

नारायण राणेंची मुलं ही अत्यंत तीव्र शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. शिवसैनिकांना आधीच बाळासाहेबांविरोधी बोललेलं चालत नाही. अशा परिस्थितीत नारायण राणेंना भाजपमध्ये घेतलं तर शिवसैनिक नाराज होतील.

नारायण राणेंच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटील म्हणतात

मुंबई प्रतिनिधी| नारायण राणे भाजपमध्ये सामील होणार अशा चर्चा मागील काही दिवसापासून सतत सुरु आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेना विरोध करेल असे बोलले जाते आहे. मात्र शिवसेना मवाळ भूमिकेत असल्याने राणेंचा भाजप प्रवेश होईल असे बोलले जाते आहे. याच संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी त्यावर मत व्यक्त केले आहे. नारायण राणे यांना भाजपमध्ये … Read more

सिंधुदुर्ग भाजपला राणे प्रवेश मान्य, अंतिम निर्णय भाजप प्रवेशावर कोअर कमिटी घेणार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत आज भाजपाची मुबंईमध्ये कोअर कमिटी बैठक होणार आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोललं जातं आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत निर्णय होणार असून भाजपा शिवसेना युती होणार की नाही यावर देखील चर्चा होणार आहे. परंतु आत्तापर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत काहीच कल्पना नाही असे सांगणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपला देखील … Read more