पंतप्रधान मोदीजी, देशाला तुमच्याकडून सत्य ऐकायचंय!- राहुल गांधी

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यातील संघर्षानंतर सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलेला नाही, घुसखोरी केलेली नाही’ या वक्तव्याला विरोधकांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर यावं आणि चीनच्या घुसखोरीबद्दल खरं काय आहे ते सांगावं, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे केलं … Read more

१ जुलैपासून बदलणार ‘या’ सरकारी स्किमचे नियम; करोडो लोकांवर होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेतील ‘अटल पेंशन योजना’ यामध्ये ऑटो डेबिटमधून सुट देण्याची मुदत ही 30 जून रोजी संपुष्टात येत आहे. यानंतर 1 जुलैपासून या योजनेत बचत झालेल्या लोकांच्या खात्यातून ऑटो डेबिट पुन्हा एकदा सुरू होईल. यासाठी 11 एप्रिल रोजी ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ (पीएफआरडीए)ने 30 जूनपर्यंत एपीवाय अंतर्गत ऑटो … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा चीन गैरफायदा घेतोय- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारतीय हद्दीत चीनने कोणत्याही प्रकारची घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चीनकडून गैरफायदा घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमण केले नाही, हा पंतप्रधान मोदींचा दावा साफ खोटा आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे वाटाघाटींमध्ये भारताची भूमिका … Read more

‘कोरोना कॉलर ट्यून’मागच्या षडयंत्राचा खुलासा पंतप्रधान मोदींनी करावा- प्रकाश आंबेडकर

सोलापूर । कोरोनाच्या संकटाच्या काळात प्रत्येकाच्या मोबाइलवर वाजणाऱ्या कॉलर ट्यूनमागे नेमके काय षडयंत्र आहे, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ‘मागील ३ महिन्यांपासून प्रत्येकाच्या मोबाइलवर कोविडची कॉलर ट्यून येतेय. या माध्यमातून लोकांना विनाकारण भीती दाखवली जातेय. यामागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा,’ अशी मागणी … Read more

व्यवसायासाठी मोदी सरकार विना गॅरेंटी देत ​​आहेत ५०,००० चे कर्ज, तुम्हालाही आहे संधी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास आणि त्यासाठी लोन मिळत नसल्याच्या समस्येचा सामना करत असाल तर पंतप्रधान मोदींची ही भेट तुमच्यासाठीच आहे. कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे मोदी सरकार मुद्रा शिशु योजनेंतर्गत कर्जावरील व्याज दरावर 2 टक्के सवलत देत आहे. सरकारकडून कर्जामध्ये देण्यात आलेल्या या सूटचा फायदा केवळ … Read more

कोरोना महामारीशी लढणाऱ्या योध्यांसाठी ‘एवढं कराचं’; उद्धव ठाकरेंचं मोदींना पत्र

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एमडी आणि एमएसची परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर हे पत्र शेअर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मध्यस्थी करत भारतीय मेडिकल काऊन्सिलला आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. “अंतिम वर्षाचे निवासी … Read more

मोदी सरकारने कोरोना आणि डिझेल-पेट्रोलचे दर केले ‘अनलॉक’; राहुल गांधींचा टोला

नवी दिल्ली । मोदी सरकारनं देशात अनलॉक जाहीर केल्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येबरोबरच इंधनाचेही दर वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. यावर लक्ष वेधत ‘मोदी सरकारनं करोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत”, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे. काही दिवस राहुल गांधी यांनी लॉकडाउन अयशस्वी झाल्याचा दावा करत त्याचे आलेखही शेअर … Read more

अखेर PM Care फंड आला कामाला; व्हेंटिलेटर्ससाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत. पाच कंपन्यांना हे … Read more

तरी चीनकडून मोदींचं कौतुक का? राहुल गांधींचा संतप्त सवाल

नवी दिल्ली । भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखमध्ये चीननं घोसखोरीचं केली नसल्याच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधी पक्षांचा तिखट सूर मावळत नाही, तोच गांधी यांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित करत सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित केला आहे. चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्ताचा संदर्भ … Read more

भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे- डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली । लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे, असा आग्रह पत्रात केला आहे. अपप्रचार हा कधीही कूटनीति किंवा खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरू शकत नाही. खुषमस्करी करणाऱ्या सहकाऱ्यांकडून खोट्या गोष्टी पसरवून सत्याची मुस्कटदाबी … Read more