भारतीय लष्कराची गुप्त माहिती मिळविण्याचा डाव; दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक

नवी दिल्ली । भारतीय सैन्याची गुप्त माहिती मिळविण्याचा आयएसआय चा डाव लष्करी तपास यंत्रणांनी आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा अधिकारी म्हणून काम करणारा अबिद हुसेन हे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने त्याच्या संपर्कात असलेल्या भारतीय व्यक्तीला भारतीय तपास यंत्रणापासून वाचण्यासाठी व्हाट्सअप अप्लिकेशन चा वापर करण्यास सांगितले होते. म्हणजे तो … Read more

निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ … Read more

जेव्हा मुलाला दुखापत होते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही; पंतप्रधानांनीही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवावेत – राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या देशातील विविध पत्रकार आणि विचारवंतांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत आहेत. आज राहुल यांनी काही पत्रकारांसोबत व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर टीका करत शेतकरी आणि कामगारांच्या थेट खात्यावर सरकारने पैसे पाठवावेत अशी मागणी केली. जेव्हा … Read more

लज्जास्पद! कोरोना संशयिताची चाचणी घ्यायला गेलेल्या मेडिकल टीम व पोलिसांवर दगडफेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात काहीजणांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय पथक आणि पोलिसांवर दगडफेक केली. वैद्यकीय पथक आणि पोलिस त्या भागात कोरोना संशयिताचा शोध घेण्यासाठी गेले होते. रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने सांगितले की, “जेव्हा आमची टीम रूग्णांसह रुग्णवाहिकेत चढली तेव्हा अचानक जमावाने गर्दी केली आणि दगडफेक सुरू केली. काही … Read more

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

नवी दिल्ली । कोरोना विषाणूने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारच्या घरात पोहोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन चा कालावधी वाढवून ३ मी केला आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउन संदर्भात नवीन नियमावली बनवली आहे. यात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली सूची केंद्र सरकारने प्रकाशित केली आहे. … Read more

दिलासादायक! कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अर्थमंत्रालयाने केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

दिल्ली | करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती आयकर आणि जीएसटी संदर्भात नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थमंत्रालयानं केल्या. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त परिषद घेऊन या घोषणा केल्या. महत्वाच्या घोषणा – करोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर भरण्याची तारीख ३० मार्च ऐवजी ३० … Read more

मी ज्योतिरादित्यला चांगलं ओळखतो ; राहुल गांधींनी सांगितले काॅलेज पासून सोबत असणार्‍या मित्राचे काँग्रेस सोडण्याचे ‘हे’ कारण

दिल्ली | मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना खूप चांगलं ओळखतो. मी आणि ज्योतिरादित्य काॅलेजमध्ये सोबत होतो असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना गांधी यांनी सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाबाबत आपले मत व्यक्त केले. Rahul Gandhi, Congress: This is a fight of ideology, on one … Read more

ज्योदिरादित्य सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना, थोड्याच वेळात करणार भाजपात पक्षप्रवेश

दिल्ली प्रतिनिधी | काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी होळीच्या दिवशी काँग्रेस पक्षाचा राजीनामा सादर केला. आता सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना झाले असून ते थोड्याचवेळात भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. Delhi: Jyotiraditya Scindia is on his way to BJP office and will join the party shortly. https://t.co/rzN1OB8W4X pic.twitter.com/7i09FkOYBJ — ANI (@ANI) March … Read more

लष्करप्रमुखांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – पी. चिदंबरम

तिरुवनंतपुरम | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. या कायद्यावरून राजकीय स्टंटबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच लष्करप्रमुखांनी या कायद्याविरोधात आंदोलन कर्त्यांना निशाणा केले. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सुनावले आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष … Read more