नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Untitled design T.

अहमदनगर प्रतिनिधी | काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून अहमदनगर लोकसभा मतदार संघातून ते आगामी निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी कडून सुजय विखे यांच्यासाठी प्रतिस्पर्धी म्हणून विधानसभेचे अरुण जगताप किंवा प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेससाठी सोडण्यास … Read more

राजकारणातील बालहट्ट पुरविताना जाणता राजा चक्रव्युव्हात

Untitled design

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पक्षातील लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हट्टपुरवताना चक्रव्यव्हात अडकले आहेत. एकिकडे राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाची अधिकृतपणे कोणतीही यादी जाहीर झाली नसून आपला मार्ग निवडायला आपण मोकळे आहोत असं वक्तव्य केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव … Read more

राष्ट्रवादीला मोठा धक्का… ‘यांचा’ भाजप प्रवेश

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | माढ्यातील विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. त्याचबरॊबर राष्ट्रवादीच्या खासदाराचे सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीकडून माढा लोकसभा मतदार … Read more

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपण आगामी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर पवार यांच्या कार्यकर्त्यांत त्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. यापार्श्वभुमीवर पवार यांचे नातू आणि पुणे जि.प. सदस्य रोहित पवार यांनी “साहेब आपण … Read more

पवारांची जादू, उदयनराजे व शिवेंद्रराजे एक दिलाने निवडणूक लढवणार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभेच्या जागेचा अखेर सस्पेन्स संपला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मनोमीलन तुटल्यानंतर एकमेकांना पाण्यात पाहणार्‍या दोन्ही राजांमध्ये दिलजमाई करण्यात खा. शरद पवार यशस्वी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांनी आज ११ वाजता मुंबईत तातडीची बैठक बोलावली … Read more

मनसे लोकसभा लढणार नाही ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची चर्चा झाली असून मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले जात आहे. मनसे फक्त महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मनसे काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीत समाविष्ट होणार का नाही हा प्रश्न अजून उलगडला नाही. मात्र मनसे लोकसभा निवडणूक न लढता फक्त … Read more

सुजय विखे-पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढणार ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | अहमदनगर येथील जागेचा तिढा आघाडीमध्ये कायम आहे.राष्ट्रवादी नगर येथील जागा सोडायला तयार नसल्यामुळे सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार का या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटल म्हणाले की,आघाडी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. त्यामुळे आता सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे … Read more

आधी लगीन लोकसभेचं मग विधानसभेचं …

Untitled design

इंदापूर प्रतिनिधी | राज्यात लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे.मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली तरच लोकसभा निवडणुकीत आघाडीची काम करू अन्यथा आघाडीचे काम करणार नसल्याचा पवित्रा इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र ‘आधी लोकसभा जिंकायची आहे, … Read more

मावळमधे राष्ट्रवादीकडून ‘या’ लढणार ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी मावळमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी पुढे आणले आहे. स्मिता पाटील यांच्याशी पक्षाच्या नेत्यांची प्राथमिक बोलणी झाली आहे. फक्त स्मिता पाटील यांच्याकडून होकार येण्याची पक्ष वाट बघतोय. आर. … Read more

सैन्याच्या मागे एकत्रीतपणे उभे राहण्याची गरज – शरद पवार

चांदवड प्रतिनिधी | नुकताच देशातील सैनिकांवर दहशवादी हल्ला झाला. त्यानंतर हवाई दलाने कारवाई करून आतंकवाद्यांचे स्थळ उद्ध्वस्त केले. देशाच्या ऐक्याचा प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद, राजकारण बाजूस ठेवून सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन एकत्रितपणे आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. चांदवड येथे आयोजित दिंडोरी … Read more