अरुण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. अनेक आजरांनी त्यांना ग्रासल्याने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मागच्या काही दिवसापूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुमच्या … Read more

अबब! पी. चिदंबरम यांची एवढ्या कोटींची संपत्ती

नवी दिल्ली | आयएनएक्स(INX) मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे. या कोठडीत त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्याचा सीबीआयचे अधिकारी प्रयत्न करणार आहेत. मात्र पी. चिदंबरम यांची संपत्ती एवढी आहे की त्यांच्या संपत्तीचे विवरण वाचूनच तुमचे डोळे फिरतील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी पी. चिदंबरम यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला … Read more

पी. चिदंबरम यांना जामीन नाहीच ; २६ ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन पुन्हा एकदा न्यायालयाने फेटाळला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. पी. चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांना कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पी. चिदंबरम यांचे वकील पत्र काँग्रेस … Read more

लग्नाचे आमिष लावून शरीर संबंध ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या अथवा ऐकल्या असतील मात्र या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला शरीर संबंध ठेवताना माहित असेल की या नात्याचे लग्नात रूपांतर होणार नाही आणि तरी देखील ती स्वेच्छेने शरीर संबंध ठेवत असेल तर मग तो बलात्कार होऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका … Read more

नाना पाटेकरांनी घेतली अमित शहा यांची भेट ; भाजप प्रवेशाची चर्चा

नवी दिल्ली | नाना पाटेकर यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र नाना पाटेकर अन्य कारणाने अमित शहा यांना भेटायला गेले होते असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. विधानसभेची ज्या राज्यात निवडणूक आहे. त्या राज्यातील नामांकित आणि एकाद्या क्षेत्रात प्रसिद्ध असणारी व्यक्ती भाजपमध्ये घेण्याचे भाजपने निश्चित केले … Read more

भाजपमध्ये आलेल्या आयारामांना उमेदवारीचे कोणतेच आश्वासन देवू नका : अमित शहा

नवी दिल्ली |  राज्याचे सत्तासमिकरण जुळवण्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची धूळधाण झाली आहे. राजकीय सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील आघाडीचे नेते सैरभैर झाले आहे. याच पार्श्वभूमिवर आघाडीतील दिग्गज नेत्यांनी कॉंग्रेसचा हात आणि मनगटावरचं घड्याळ सोडून कमळ हाती घेणं अधिक पसंत केलं आहे. कमळाच्या दिशेने वाढणारे हात थांबता थांबत नाहीये. आघाडीचे सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नाही तेव्हा सत्ताधारी … Read more

पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन न्यायालने नामंजूर करत फेटाळून लावाल आहे. न्यायालयाकडून त्यांना मिळालेला आजवरचा हा सर्वांत मोठा धक्का मानला जातो आहे. ईडी आणि सीबीआयने त्यांना जामीन दिला जाऊ नये म्हणून न्यायालयात बाजू मांडली. तर चिदंबरम यांना प्रसिद्ध वकील मानले जाते तरी देखील त्यांचे विधी कौशल्य त्यांना न्यायालयात … Read more

कपबशी नव्हे हे असणार वंचित आघाडीचे चिन्ह ; निवडणूक आयोगाचा चिन्ह बदलाचा निर्णय

नवी दिल्ली |  महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यातच संपन्न होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका घेणे क्रमप्राप्त असणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निसर्गावर खूप प्रेम आहे ; बेअर ग्रिल्सने दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्यावरणावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना निसर्ग अगदी मनापासून आवडतो याचा अनुभव त्यांच्यासोबत केलेल्या कार्यक्रमात मला घेता आला असं मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्सने म्हटलं आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर प्रसारित होणा-या मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमात राजकारणातील सर्वाधिक व्यग्र असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे पाहायला मिळणार आहे. … Read more