देशात कांदा २२ रुपये किलो दराने विकला जात आहे-केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

टीम हॅलो महाराष्ट्र । कांद्याच्या दराने गेल्या काही महिन्यापासून उचांक गाठला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या डिसेंबरमध्ये महागाई दरात वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीनुसार सांगण्यात आलं. दरम्यान कांद्याच्या वाढलेल्या दरापासून सामन्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारच्या वतीने आयात करण्यात आलेला कांदा नाफेड आणि राज्य सरकारांमार्फत विशेष स्टॉल लावून कमी किंमतीत कांदा विकला जात आहे. देशातील मागणी … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात कांद्याचे भाव उतरले; १०० चा कांदा आला ५० ते ६० रुपयांवर

संपूर्ण देशाच्या बहुतांश भागात यंदा पावसाने उशिरापर्यंत जोरदार हजेरी लावली. तसेच उशिरा झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याचा सर्वात मोठा परिणाम कांद्याच्या उत्पनावर झाला. घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. राज्याप्रमाणे औरंगाबाद मध्ये देखील कांद्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता काही प्रमाणात कांद्याचे दर झाल्याचे पाहण्यात येत आहे.

मुंबईत कांदा चोरांचा सुळसुळात, दोघांना अटक

मुंबई | कांद्याच्या किंमतींत गेल्या काही दिवसात वाढ झाली असून भारतातील विविध राज्यांत प्रति किलो १०० डॉलर दराने विक्री होत आहे. कांद्याच्या भाववाढीनंतर मुंबई पोलिसांनी डोंगरीतील दोन दुकानांतून २१,१६० रुपये किमतीची कांदा चोरल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चोरी एक आठवड्यापूर्वी झाली होती परंतु मंगळवार, १० डिसेंबर रोजी ही अटक करण्यात आली … Read more

ग्रामीण भागातील हॉटेलमधून कांदा भजी गायब! सर्वसामान्यांना कांद्याचे भाव सोसवेनात

मराठमोळ्या खाद्यपदार्थाच्या मांदियाळीत कांद्याची स्थान अनन्यसाधारण आहे. त्यात कांदा भजी कोणाला आवडत नाहीत ? असा अन्नपदार्थांची चव वाढवणारा कांदा काही दिवसापासून मात्र स्वयंपाक घरातील आपले स्थान ही गमावून बसला आहे. एरवी 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे मिळणारा कांदा आता शंभरी पार केल्यामुळे हॉटेलमध्ये कांदा भजी व कांदा पोहे विकणे हॉटेल चालकांना परवडत नसल्यामुळे कांदा-भजी ग्रामीण भागातील हॉटेलमधून गायब झाली आहेत. तर सर्वसामान्यांनाही कांद्याचे भाव सोसवेनासे झाले आहेत.

कांद्याला दिलेल्या अनुदानात मंत्र्यांच्या कपड्याची इस्त्रीही होणार नाही : बच्चू कडू

Bachhu Kadu

चांदवड | सरकरने शेतकऱ्यांची पिळवणूक करत कांद्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ‘सरकारने दिलेल्या अनुदानात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कपड्यालाही इस्त्री होणार नाही’ असा टोला कडू यांनी यावेळी लगावला. कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर … Read more