गणेश मंदिराची तोडफोड, भारताच्या नाराजीमुळे पाकिस्तान बॅकफूटवर; दिले चौकशीचे आदेश

imran khan

इस्लामाबाद । भारताने गणेश मंदिर पाडण्याबाबत कडकपणा दाखवल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने या विषयावर ट्विट केले आहे. त्याने म्हटले आहे कि,” भोंगच्या गणेश मंदिरावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मी पंजाब पोलिस महानिरीक्षकांना सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश आधीच दिले आहेत. तसेच पोलिसांच्या निष्काळजीपणावरही कडक कारवाई झाली पाहिजे. सरकारकडून मंदिराची पुनर्बांधणीही केली … Read more

तालिबानी दहशतवाद्यांवर अफगाणिस्तानचा मोठा हल्ला, 48 तासांत सुमारे 300 ठार

काबूल । अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानी दहशतवाद्यांवर मोठा हल्ला चढवला आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने दावा केला आहे की,”गेल्या 48 तासांत त्यांनी सुमारे 300 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्याच्या माघारीनंतर तालिबानची ताकद वाढू लागली आहे. अलीकडच्या काळात तालिबानने दावा केला आहे की, त्यांनी अफगाणिस्तानचा बहुतांश भाग काबीज केला आहे. पण आता अफगाणिस्तानच्या झटपट … Read more

पाकिस्तानने आपला मित्र चीनला दिला जोरदार धक्का, टिकटॉक अ‍ॅपवर पुन्हा घातली बंदी

इस्लामाबाद । चीनला मोठा धक्का देत पाकिस्तानने पुन्हा एकदा टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घातली आहे. आक्षेपार्ह कन्टेन्ट दिल्याबद्दल पाकिस्तानने बुधवारी टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशानंतर या अ‍ॅपवर दोन दिवस बंदी घालण्यात आली होती. तथापि, इथले बरेच वकील देशातील सरकारी सेन्सॉरशिप आणि इंटरनेट आणि माध्यमांवर वेळोवेळी पाकिस्तानच्या नियंत्रणाबाबत टीका करीत आहेत. … Read more

पाकिस्तानमध्ये तालिबान्यांना पाठिंबा का वाढत आहे? त्यामागील कारणे जाणून घ्या

पाकिस्तान । अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून जसजसे पूर्णपणे माघारी गेले तसतशी तालिबान्यांची ताकद वाढू लागली. आता असेही मानले जाते आहे की लवकरच किंवा नंतर कबूलही तालिबानच्या ताब्यात जाईल. अफगाणिस्तानात तालिबान आणि अमेरिका यांच्यातील समीकरणात पाकिस्तानचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. आता अमेरिका या समीकरणातून मागे हटल्यामुळे पाकिस्तान-तालिबान संबंधांचे विश्लेषण सुरू झाले आहे. अलीकडे असे दिसून आले आहे की, … Read more

सीमेपलिकडे असलेल्या मोकळ्या जागी पाकिस्तानने जाळली 10 क्विंटल हेरॉईन, भारतातील खेड्यांमध्ये रात्रभर पसरली दुर्गंधी

चंदीगड । अमृतसरच्या भारत-पाक सीमेवर असलेल्या मोकळ्या जागी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सुमारे 10 क्विंटल हेरॉईन आणि इतर अमली पदार्थ जाळले. ज्याच्या काळ्या धुरामुळे त्याभागातील आकाश आच्छादित झाले. तसेच त्याची दुर्गंधी भारताच्या त्या सीमावर्ती भागात पसरू लागली. एका मीडिया रिपोर्टनुसार इंटीग्रेटेड चेक पोस्ट (Integrated Check Post) वर झिरो लाइन ओलांडून 800 मीटर अंतरावर पाकिस्तानचे कार्गो आहे. तिथेच … Read more

अफगाणिस्तानच्या राजदूताच्या मुलीचे अपहरण केल्याबद्दल संतप्त तालिबान म्हणाले,” पाकने आरोपींविरोधात त्वरित कारवाई करावी”

काबूल । पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या राजदूताच्या मुलीच्या अपहरणानंतर तालिबान संतप्त झाला आहे. तालिबान्यांनी याचा निषेध करत म्हटले आहे की, या कृत्यास जबाबदार असणाऱ्यांना न्यायालयात आणले पाहिजे. दोहामधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी ट्वीट केले: “आम्ही पाकिस्तानात एका अफगाण मुलीवर झालेल्या अपहरण आणि हिंसाचाराचा निषेध करतो.” सुहेल शाहीन म्हणाले, “अशा प्रकारचे कृत्य केल्याने या दोन्ही … Read more

इम्रानने स्वत:ला ‘काश्मिरींचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हंटले

imran khan

इस्लामाबाद । काश्मीरबाबत सर्व गोष्टींवर राग आळवणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान हे काही केल्या सुधरत नाही. वास्तविक, पाक-व्याप्त काश्मीरमध्ये शनिवारी एका निवडणूक रॅली दरम्यान इम्रानने स्वत:ला काश्मिरींचा “ब्रँड अ‍ॅम्बेसेडर” म्हंटले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, आपण काश्मिरींच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत खान यांनी “काश्मिरींचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर” असल्याचा दावा केला. कुराणचा दाखला देत पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले … Read more

पाकिस्तानातील दहशतवादी स्फोटानंतर चीनन थांबवले CPEC प्रकल्पाचे काम

इस्लामाबाद । पाकिस्तानच्या उत्तरी प्रांतातील खैबर पख्तूनख्वा येथे दासू धरण बांधणारी चिनी कंपनी CGGC ने शनिवारी बस स्फोटात आपल्या इंजिनिअर्सचा मृत्यू झाल्यानंतर धरणाचे बांधकाम स्थगित करण्याची घोषणा केली. बुधवारी, खैबर पख्तूनख्वा येथे प्रवासी बसमध्ये झालेल्या स्फोटात नऊ चिनी इंजिनिअर्ससह 13 जण ठार तर अनेकजण जखमी झाले. अप्पर कोहिस्तान जिल्ह्यात ही बस दासू शहराकडे जात असताना … Read more

दहशतवादी हल्ल्याबद्दल चीन भडकला, म्हणाला-“पाकिस्तान कारवाई करू शकत नसेल तर आम्ही सज्ज आहोत”

बीजिंग । पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर कोहकिस्तान जिल्ह्यातील दासू परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या दासू धरण प्रकल्प साइटवरील बस स्फोटाबाबत चीनने कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेत नऊ चीनी नागरिक आणि फ्रंटियर कॉर्प्सचे दोन सैनिक यांच्यासह कमीतकमी 13 जण ठार झाले तर अन्य 39 जण जखमी झाले. स्फोटानंतर बस एका खोल दरीत कोसळली. या दहशतवादी … Read more

अफगाण राजदूताच्या मुलीचे पाकिस्तानात अपहरण, अनेक तासांच्या अत्याचारानंतर सोडण्यात आले

इस्लामाबाद । इस्लामाबादमधील अफगाणिस्तानचे राजदूत नजीबुल्ला अलिखील यांच्या मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील अफगाण राजदूत नजीबुल्ला अलिखील यांची मुलगी सिलिसिला अलीखील हिचे 17 जुलै (शनिवारी) इस्लामाबाद येथील घरी परत जाताना अपहरण केले … Read more