साईबाबा जन्मस्थळ पाथरीसाठी विकास निधी उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिर्डी येथील साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असून परभणी जिल्ह्यातील विविध समस्या,अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून औरंगाबाद येथे आयोजित परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

संविधान बचाव समितीच्या वतीन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात निघालेल्या मोर्चेकऱ्यांवर चुकीच्या पध्दतीने व दडपशाही करत गुन्हे दाखल केल्याचा आरोप करित संविधान बचाव समितीच्या वतीने पोलीसांचा निषेध नोंदवत ,दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य शिबीर संपन्न

जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ग्रामीण रुग्णालय पाथरी येथे ताणतणाव मुक्त मानसिक आरोग्य शिबीराचे आयोजिन करण्यात आले होते.

सेलूमध्ये विधिसेवा व प्रशासकीय समाधान महाशिबिर संपन्न

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी व जिल्हा प्रशासन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विधिसेवा महाशिबिर व प्रशासकीय समाधान शिबीर सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी पार पडले.

थंडीपासून संरक्षणासाठी चुलीसमोर बसलेल्या महिलेचा जळून दुर्दैवी मृत्यू

परभणी जिल्ह्यातील गारठून टाकणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील चुलीसमोर बसलेल्या महिलेच्या साडीने अचानक पेट घेतल्याची दुर्दैवी घटना नववर्षाच्या सायंकाळी पाथरी तालुक्यात घडली. याघटनेत महिलेचा परभणीत उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.

शेतकरी कर्जमाफी अध्यादेशाची परभणीमध्ये होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे – सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी म्हणून दोन लाख रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाच्या प्रतींची होळी करत आंदोलन केले. अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने न पाळता शेतकर्‍यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत, परभणी मध्ये आज … Read more

एनआरसी आणि सीएए कायद्याच्या समर्थनात भाजपची स्वाक्षरी मोहीम

परभणीमध्ये केंद्र सरकारने आणलेल्या या कायद्याच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या करून एक लाख स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यात गामपंचायती जोडल्या जाणार वेगवान इंटरनेटने

संपूर्ण राज्यात भारतनेट-महानेट प्रकल्प् महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यांत येत असून या प्रकल्पा्द्वारे परभणी जिल्हाातील ४ तहसिल कार्यालये व त्यांअंतर्गत येणारे ४२८ ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडले जाणार आहेत. ग्रामस्तवरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारव्दारे हा उपक्रम सुरु केला आहे.

उमरी गावांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा वृद्ध महिलेसह बालिकेवर हल्ला, दोघींची प्रकृती गंभीर

परभणी तालुक्यातील उमरी या गावामध्ये, एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यांमध्ये गावातील ६८ वर्षीय महिलेसह, सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी घडली. जिल्हातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मागील महिन्यात पाथरी तालूक्यातील वाघाळा गावात ८ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावे घेतल्याची घटना ताजी असताना आता परभणी तालुक्यातील उमरी गावातही पिसाळलेल्या कुत्र्याने चावे घेतले आहेत.

‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री उशिरा पर्यंत चालले मतदान

जिल्ह्यात काल विधानसभेचे मतदान शांततेत मतदान पार पडले असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. काल सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान करण्याची वेळ होती. या गावात ८.३० पर्यंत मतदान चालू होते. या मतदान केंद्रामध्ये तब्बल ३००० मतदार असताना सुद्धा केवळ दोन व्हीव्हीपॅट वर काम चालू होते.