परभणी जिल्हा वार्षिक योजनेच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

परभणी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग ६१वर झालेल्या अपघातात दोघां तरुणांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर दुचाकीवरून गावाकडे परत येत असलेल्या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीड जिल्हातील माजलगाव हद्दीत हा अपघात घडला. मृतांमध्ये पाथरी तालुक्यातील किन्होळा येथील ग्रामपंचायत सदस्यासह आणखी एका तरुणांचा समावेश आहे.

राज्यस्तरिय किशोर-किशोरी कबड्डी संघ निवड चाचणी; परभणीची उत्कृष्ठ कामगिरी

अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद किशोर व किशोरी कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत परभणीच्या दोन्ही गटातील संघानी उत्कृष्ठ कामगिरी करत यश संपादन केलं आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना यांच्या वतीने दि. २३ ते २५ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद किशोर व किशोरी या दोन गटांसाठी कबड्डी निवड चाचणी स्पर्धा अहमदनगर येथे यशस्वी रित्या संपन्न झाल्या. यामध्ये परभणी जिल्हा किशोर गट ( मुले) व किशोरी गट ( मुली )कबड्डी संघाने चांगली कामगिरी करुन जिल्हाचा नावलौकिक केला.यावेळी मुलींच्या किशोरी गटाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला तर किशोर गट मुलांनी अतिशय अटीतटीची झुंज देत तिसरा क्रमांक पटकावला.

झेंड्यावर राजमुद्रा वापरल्यामुळे संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंच्या विरोधात सोनपेठ पोलिसांत तक्रार

मनसेच्या नव्या झेंड्यांवरून वादाला तोंड फुटले असून, झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रेवर आक्षेप घेत आता शिवप्रेमींकडून विरोध होऊ लागला आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बंदला परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; CAAच्या विरोधात सर्वत्र निदर्शनं

वंचित बहुजन आघाडी व परिवर्तनवादी संघानेच्या वतीने, आज NRC आणि CAA ला विरोध करत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालूक्यांमध्ये बंदमुळे जनजीवन विस्कळीत आहे. आरोग्य सेवा वगळता सर्वच दुकाने यावेळी सकाळपासूनच बंद आहेत. रस्त्यावरही दुपारपर्यंत शुकशुकाट दिसत आहे.

परभणीत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, आपल्या मागण्यांसाठी आता अधिक आक्रमक झाल्या असून, परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी, तसेच या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन लागू करावे.

परभणी जिल्ह्यात तब्बल २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; पाथरी पोलीसांची मोठी कारवाई

पाथरी शहरात नियमीत गस्तीवर असणार्‍या स्थानिक पोलीसांनी आज पहाटे प्रतिबंधित गुटख्याने भरलेला एक ट्रक पकडला. या ट्रकची तपासणी केली असता यात तब्बल २२ लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. या कारवाईनंतर राज्यात बंदी असलेला गुटखा परभणी जिल्ह्यामध्ये खुलेआम विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या गुटखा माफियांचे धाबे आता दणाणले आहे.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदी घाला, मावळा संघटनेने केली मागणी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करून भाजपा नेता व पुस्तक लेखक भगवान गोयल यांनी शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून, महाराजांची तुलना जगातील कोणत्याही व्यक्तीशी होऊच शकत नाही ! असे म्हणत सदरील लेखकावर तात्काळ कारवाई करत पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी मावळा संघटनेच्या वतीने आज … Read more

परभणीमधील शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा;२६ गंभीर

परभणी जिल्हातील पांगरा येथील शासकीय निवासी शाळेमध्ये गुरुवारी रात्री ३५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असुन २६ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पाथरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या गाथा पारायणाचा उपक्रम राबविला

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे सामाजिक कार्य व स्त्री शिक्षण यासाठीचे योगदान सर्व महिला समोर ठेवत आपणही त्यांची प्रेरणा घेवुन सावित्रीची लेक होवू हि भावना रुजावी या उद्देशाने मागील आठ दिवसांपासुन सावित्री गाथेतील वरिल ओव्यांचे पाथरी तालूक्यातील दोन गावामध्ये पारायण करण्याचा वेगळा उपक्रम महिला राजसत्ता आंदोलनातील गावशाखेच्या महिलांनी राबवला. निमित्त होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे. पाथरी तालुक्यातील रामपुरी व देवनांद्रा गावातील महीलांनी यात सहभाग घेतला होता. दिनांक ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापासुन शुक्रवार 9 जानेवारी पर्यंत हे पारायण करण्यात आले.