आ. शंभूराज देसाईमुळे माझे पद गेले, निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय झाला : हर्षल कदम

पाटण | स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासोबत आमचेही कौटुंबिक संबंध होते. परंतु आमची निष्ठा केवळ ठाकरे कुटुंब व शिवसेनेसोबत आहे. मागील काही दिवसात आमच्यावरही अन्याय झाला. माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी माझ्याही अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. त्यानंतर मलाही पदावरून दूर करण्यात आले, मात्र आम्ही आमची पक्षासोबत असणारी निष्ठा ढळू दिली नाही. पुन्हा माझ्यावर पक्षप्रमुख उद्धव … Read more

काॅलेजवरून घरी येणाऱ्या भाग्यश्री मानेंचा खून : चार वर्षांनी पुन्हा चाैकशी सुरू

कराड | पाटण तालुक्यातील तळमावले गावापासून काही अंतरावर असलेल्या करपेवाडी येथील महाविद्यालयीन युवतीचा घरी परतताना 2019 साली खून झाला होता. या खुनाचा अखेर चार वर्षांनी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवतीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून नरबळीसाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. त्यादृष्टीने आरोपीकडे कसून तपास … Read more

पाटण तालुक्यात 80 कुटुंबाचे स्थलांतर : रमेश पाटील

सातारा | पाटण तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे व संभाव्य अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी तालुक्यातील 5 गावातील 80 कुटुंबातील 310 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, सध्या पाटण तालुक्यात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गतवर्षीचा नैसर्गिक आपत्तीचा … Read more

पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन : प्रशासन सतर्क

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील डोंगर- दऱ्यातील पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. काटे- अवसरी परिसरातील खुडपुलेवाडी आणि जितकरवाडी येथे भूस्खलन झाल्याचे ट्विट प्रातांधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे. #सातारा #पाटण तालुक्यातील काटे अवसरी परिसरातील खुडपुले वाडी येथे … Read more

गव्याने 60 वर्षीय वृध्दाचे काळीजच फाडले : पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोरणा विभागातील पश्चिमेला अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या पांढरेपाणी गावातील 60 वर्षीय वृद्धावर गव्याने हल्ला करून काळीज फाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या वृध्दाला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखले केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून डोलीत बसवून 2 तास पळवत आणून 6 ते 7 … Read more

ढेबेवाडी खोऱ्यातील 25 गावांचा संपर्क तुटला : पुलाचा भराव वाहून गेला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ढेबेवाडी खोऱ्यातील निवि कसणी, घोटीलसह 25 होऊन अधिक दुर्गम भागातील गावांना व वाड्यावस्त्यांना जोडणारा पवारवाडी- महाईंगडेवाडी येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात या मार्गावरील पूल उध्वस्त झाला होता, त्यानंतर भराव भरून वाहतूक सुरू होती. परंतु हा भरावही पहिल्याच पावसात वाहून गेल्याने आता वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे. … Read more

कसणी घोटीलसह 25 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अनेक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांच्या दळणवळणासाठी उपयुक्त असलेला आणि भरावाच्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांनी बांधलेला ढेबेवाडी विभागातील दुर्गम कसणी गावाजवळचा पूल पावसाचा जोर वाढल्याने पाण्याखाली जाण्याची भीती आहे. भराव टाकलेला वाहून जाण्याची भीती असून वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलापलीकडील कसणी घोटील, निगडे, महेंगडेवाडीसह अनेक वाड्यावस्त्या संपर्कहीन होण्याची शक्यता असल्याने … Read more

आमच्या कामांची उद्घाटने राष्ट्रवादीच्या आमदार- खासदारांनी केली : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ज्यांच्या विरोधात आम्ही मते मागितली होती. त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून सत्तेत बसणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. आमच्या मतदारसंघातील आम्ही सुचवलेल्या कामांचेही राष्ट्रवादीच्या आमदार- खासदारांनी उद्घाटन केली, हा हस्तक्षेप ही आम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावा लागला. त्यामुळे आमची गळचेपी उघड- उघड होत होती, असा आरोप शिवसेनेचे शिंदे गटाचे आ. शंभूराज … Read more

बाळासाहेब देसाई साखर कारखाना बिनविरोध : यशराज देसाईंची एन्ट्री

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, त्यांचे चिरंजीव यशराज देसाई यांच्यासह 17 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच निवडणूक बिनविरोध झाली असली तरी याची औपचारिक घोषणा 12 जुलै रोजी होणार आहे. दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची … Read more

कोयनानगर भागातील कोळणेत शाॅर्टसर्किटने घराला आग

पाटण | कोयनानगर विभागातील दुर्गम कोळणे गावात घरास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. या आगीत घरातील रोख रक्कम, धान्य, कपडे, भांडी आदी संसारोपयोगी साहित्यासह 2 लाख 60 हजाराचे नुकसान झाले. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. कोळणे येथे बुधवारी दुपारच्या सुमारास ताईबाई दाजी डांगरे यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. आगीने काही वेळातच … Read more