व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोयनानगर भागातील कोळणेत शाॅर्टसर्किटने घराला आग

पाटण | कोयनानगर विभागातील दुर्गम कोळणे गावात घरास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. या आगीत घरातील रोख रक्कम, धान्य, कपडे, भांडी आदी संसारोपयोगी साहित्यासह 2 लाख 60 हजाराचे नुकसान झाले. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

कोळणे येथे बुधवारी दुपारच्या सुमारास ताईबाई दाजी डांगरे यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. काही धाडसी युवकांनी घराच्या छतावर चढून कौले काढली व वरून पाणी ओतण्याचा प्रयत्न केला.

आगीत घरातील कपडे, धान्य, पेटीतील रोख रक्कम आदी सर्वकाही आगीत जळाले. या आगीत ताईबाई दाजी डांगरे यांचे 2 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच तलाठी वैशाली जाधव, मंडलाधिकारी संजय जंगल यांच्यासह कोतवाल यांनी घटनास्थळी जावून आगीचा पंचनामा केला आहे.