शेतकऱ्यांच्या मक्याच्या पिकात गाजांची झाडे, 10 लाख रूपये किंमतीचा माल जप्त

म्हसवड | माण तालुक्यातील धामणी गावातील शेतकऱ्याने शेतात लावलेल्या 285 गांजाची झाडे म्हसवड पोलिसांनी जप्त केली. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शेतकरी बबन भिवा खाडे (रा. धामणी, ता. माण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धामणी येथील शेतकरी बबन भिवा खाडे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर … Read more

दरोड्याचा गुन्हा : वडूज येथील युवकास चिंचणेर वंदन येथे टोळक्याने मारहाण करून लुटले

Satara Taluka Police

सातारा | पिकअप टेम्पोचे भाडे संपवून घरी जात असताना सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे 7 ते 8 जणांच्या टोळक्याने पिकअप थांबवून चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. सोमवारी दि. 9 रोजी रात्री ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेश अनिल गोडसे … Read more

साताऱ्यात टेम्पो- दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार

सातारा |  शहरातील गुरुवार बागेजवळ पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारील युवकाचा जागीच मृत्यू झाला.  शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास झाला हा अपघात झाला. या अपघातात विनायक संपतराव साळुंखे (वय – 35 वर्षे रा. पिलानीवाडी, ता. सातारा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विनायक साळुंखे हा दुचाकीवरुन समर्थ मंदिरकडून पोवई नाक्याकडे … Read more

बॅंकेला गंडा : कोल्हापूरात बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर | शहरातील राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणून गंडा घालणाऱ्या राधानगरी तालुक्यातील दोघांना पोलिसांनी आज शुक्रवारी सकाळी बेड्या ठोकल्या. अनिकेत अनिल हळदकर (वय- 27, रा. चंद्रे, ता. राधानगरी), उत्तम शिवाजी पवार (वय- 23, रा. पालकरवाडी, कसबा वाळवा, ता. राधानगरी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. … Read more

मायलेकींना मारहाण प्रकरणी कालेतील तिघांवर गुन्हा दाखल

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घरासमोर ठेवलेली जळणाची लाकडे काढायला सांगितल्याच्या कारणावरून तिघांनी मायलेकीला मारहाण केली. तसेच त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल जंगम, सुनंदा जंगम, बापू जंगम (रा. काले, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, … Read more

कराड तालुक्यातील युवकाची 25 लाखांची फसवणूक : वडिलांच्या विम्याची रक्कम देण्याचे अमिषाने

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तुमच्या वडीलांच्या नावाची विमा पॉलीसी आहे, ती सोडविण्यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगून अवघ्या चार महिन्यात रेठरे खुर्द येथील युवकाला तब्बल 25 लाख 59 हजार 47 रूपांयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काल रात्री उशिरा तालुका पोलिसात त्याबाबतचा गुन्हा नोंद झाला आहे. अजीत सुभाष पवार (वय 29, रा. रेठरे … Read more

सांगली जिल्ह्यातील दुधोंडीत तिहेरी हत्याकांड : धारदार शस्त्राने तिघांचा खून

सांगली | पलूस तालुक्यातील वसंतनगर – दुधोंडी येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरला आहे. धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्यात अरविंद बाबुराव साठे (वय-45) , विकास आत्माराम मोहिते (वय- 32), सनी आत्माराम मोहिते (वय- 27) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत तर अन्य चौघेजण गंभीररीत्या जखमी झाले … Read more

दोनवेळा चोरी : फलटणच्या सभापतीच्या बंगल्यातील 15 लाखांवर चोरट्याचा डल्ला

Crime

फलटण | फलटण तालुक्यातील आसू येथील बंगल्यातून 15 लाख रूपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. एकाच बंगल्यात आठवड्यात दोनवेळा चोरी करत ही रक्कम लंपास केली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर यांच्या आसू येथील बंगल्यातून चोरट्यांनी हा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरट्यांनी ही चोरी दोन … Read more

साडेसोळा तोळे सोने लंपास : सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातील 5 लाख 81 हजारांच्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

खटाव | खटाव तालुक्यातील मायणी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 5 लाख 81 हजार 500 रुपये किमतीच्या साडेसोळा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. सरूताई मठाजवळ राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरात ही घटना घडली. या घटनेने मायणीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मायणी येथील मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यावरील सरुताई मठाजवळ … Read more