उद्यापासून पुन्हा वाहतुकीत बदल : पुणे- बंगलोर महामार्गावरील दुसरा उड्डाणपूल लवकरच पाडणार

Karad Kolhapur Naka

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर कराड व मलकापूर शहराच्या हद्दीत नव्याने होणाऱ्या सहापदरी उड्डाणपूल होणार असल्याने आता पुन्हा एकदा वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम गेल्या 20 ते 25 दिवसापासून सुरू आहे. आता मलकापूर फाट्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर जनरेटर जळून खाक : वाहतूक खोळंबली

Karad Generator burnt

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोल्हापूर नाका कराड येथे उड्डाणपूल पाडण्यासाठी बॅरिकेटिंगचे काम सुरू आहे. मलकापूर फाट्याजवळ पश्चिमेकडील उपमार्गावर कंत्राटदाराचा जनरेटर पेटला. या घटनेमुळे महामार्गावर तसेच सेवा रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोयना औद्योगिक वसाहतीजवळ उपमार्गावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत जनरेटर पूर्ण जळून खाक झाला. … Read more

नूडल्सच्या नावाखाली गोव्याची दारू : कराडला 1 कोटी 87 लाखाचा मुद्देमाल जप्त

liquor Karad Raid

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नूडल्सच्या नावाखाली गाेवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना पडकण्यात आली आहे. कराड हद्दीत कुडाळ येथील पथकाने ही कारवाई केली असून 1 कोटी 87 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी, एका नूडल्सच्या कंपनीचा माल म्हणून गोव्यातून … Read more

कराडच्या 19 वर्षांपूर्वीच्या मोठ्या उड्डाणपूलावर पडला हातोडा

Flyover Demolition Work Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील 19 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला उड्डाणपूल रविवारी रात्रीच्या सुमारास पाडण्यात आला. तत्पूर्वी पूल परिसरातील महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती. पूल पाडण्यासाठी 8 अत्याधुनिक मशिन, पोकलॅन, डंपर यासह अन्य वाहनांचा उपयोग केला जात आहे. कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याच्या कामास ८ फेब्रुवारीपासून … Read more

अखेर ठरलं : उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला उद्या सुरूवात

Karad Kolhapur Naka Bridge

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला. त्यासाठी कराड शहरात उड्डाणपूलाच्या खालून येणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर कराड येथील शासकीय विश्रामगृहात संबधित विभाग यांची माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावरील ‘हे’ दोन उड्डाणपूल होणार जमीनदोस्त : काय आहे प्रशासनाचा प्लॅन ते पहा

Karad Kolhapur Naka

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  पुणे- बंगलोर महामार्गावरील दोन उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका आणि कृष्णा हाॅस्पीटलसमोर असलेले उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी संबधित कंपनीकडून सुरू आहे. एक नव्हे तर दोन उड्डाणपूल पाडण्याचा प्लॅन ठरला असून यासाठीच मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. परंतु येत्या 15 ते 20 दिवसात पूल पाडण्याच्या कामास सुरूवात होणार आहे. … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर पादचारी पुलात अडकला कंटेनर : वाहतूकीचा खोळंबा

Karad Bridge

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महामार्ग ओलांडण्यासाठी बनवलेला पादचारी पुलाला उंच माल भरलेल्या कंटेनरची धडक झाली. सातारा- कोल्हापूर लेनवर गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यापुर्वीही उंची वाहन धडकल्याने पुलाचा बीमच चार इंचाने सरकला आहे. अशीच वारंवार उंची वाहन वारंवार धडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यातील मोठा अनर्थ टाळण्यासाठी तपासणी करून उपाय करावा, … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर कराडजवळ सहलीच्या बसला अपघात : विद्यार्थी व शिक्षक जखमी

Accident School Tour Bus

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे गावच्या हद्दीत शाळेची सहल घेऊन जाणा-या एसटी बस व कंटेनर यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये तीन विद्यार्थी व दोन शिक्षक किरकोळ तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. जखमींना कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील … Read more

महामार्गावर ट्रक- आयशरचा भीषण अपघात : केबिनमध्ये चालक आडकला

Pune-Bangalore Highway Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर वराडे (ता.कराड) गावाजवळ आज दुपारी ट्रक व आयशरचा भीषण अपघात झाला. यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झाले असून चालक गाडीतच अडकला होता. सुदैवाने, जीवितहानी झाली नाही, मात्र आयशरच्या चालकाला गाडीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ ट्रकला पाठीमागून आयशरने (क्र.- MH- 12-DG-8083) … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर भीषण आगीत 5 दुकाने जळाली

Shops burned Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुणे- बंगलोर महामार्गावर असलेल्या वाढे फाटा येथे लागलेल्या भीषण आगीत 5 दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. जवळपास 3 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात सातारा नगरपरिषदेच्या अग्निशामक यश आले आहे. आगीने राैद्ररुप धारण केल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. सातारा शहराच्या बाहेरून … Read more