पुण्यात मात्र बहुजन मुक्ती पक्षाने वेगळा मार्ग अवलंबत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पुणे कँटोनमेंट विधानसभा मतदारसंघातून फोटोग्राफी करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली आहे. किशोर बाजीराव तुपारे असं या उमेदवाराचं नाव आहे. तुपारे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील असून पुण्याच्या महर्षीनगर परिसरातील मीनाताई ठाकरे झोपडपट्टीत राहतात. तुपारे यांचा जन्म १९७७ सालचा. १९९० साली पुण्यात आलेल्या तुपारे यांनी कुटुंबियांच्या पाठिंब्यावर गुलटेकडी, डायस प्लॉट, महर्षीनगर आदी भागात फोटोग्राफीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचा ठामपणे सामना करत त्यांनी अल्पावधीतच व्यवसाय भक्कम केला. सासरे आणि पत्नी यांच्या पाठिंब्यावर त्यांनी व्यवसायात अपेक्षित यश मिळवलं. उच्च शिक्षण घेऊन त्यांनी वकील होण्याचं स्वप्न पाहिलं होतं मात्र बेताच्या परिस्थितीने त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. एवढं असतानाही समाजकारणाची कास त्यांनी सोडली नाही.
तुपारे हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं