सातारा जिल्ह्यात आज पुन्हा १० नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर … Read more

निलेश राणेंकडून अजित पवारांची स्तुती; परिस्थिती आणि प्रशासन हाताळण्याच्या कौशल्याचे केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेले. यामुळे कोकण परिसरातील किनारपट्टी भागातीप गावांचव मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे पुणे जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये नुकसान झाले आहे. या नुकसानीची उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी बोलून माहिती घेतली. तसेच याचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी … Read more

पुणे जिल्ह्यात दिवसभरात १७६ रुग्ण

पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात … Read more

पुण्यात येण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्यासाठी पासची गरज? पहा काय म्हणतायत पुणे पोलीस

पुणे । केंद्र सरकारने १ जूनपासून पाचच्या टप्प्यातील संचारबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच राज्यांना हे नियम राबविण्यासंदर्भात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी केंद्र सरकारच्या सर्व नियमांना संमती दिली नाही आहे. अद्याप राज्यात संचारबंदीचे नियम पाळले जाणार आहेत. पुण्यात बारामती, इंदापूर आणि … Read more

पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

परीक्षा रद्द पण बॅकलाॅग राहिलेल्यांचे काय? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय हा प्रश्न आता मिटला आहे. त्याबाबत परीक्षा रद्द केल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि मागील परीक्षांमधील गुंणानुसार श्रेणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेत विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप शासनाने सोडविला नाही. … Read more

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more

रुग्णांच्या देखभालीसाठी पुढे न येणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्सवर आता मेस्मा अंतर्गत कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या २ महिन्यांपासून सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात राज्यभरातील डॉक्टर आणि नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग हे अग्रभागी राहून काम करत आहेत. यामध्येच खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी सुरक्षेच्या कारणावरून काम करण्यास मनाई केली होती.  पुण्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनाही मेस्मा … Read more