Sunday, May 28, 2023

अल्पउत्पन्न धारकांसाठी लसीकरण कार्यक्रम

पुणे  | सेवा व सहयोग अभियान अंतर्गत अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी नगर परिसरातील गुलटेकडी औद्योगिक वसाहत आरोग्य कोठीत लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले. वसाहतील अनेक नागरीकांनी आभार व अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व भारत मातेचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन महेश करपे, दर्शन मिरासदार यांनी केले.

यावेळी डॉ. प्रसाद खंडागळे , विशाल पवार, स्वाती शेरला, बादशहा सय्यद, बाळासाहेब शेलार, रमेश बिबवे, अनुसया गायकवाड, अभिजित घोमन, पोपट माने, वसंत पुरंदरे, राहुल लोंढे, केतन क्षीरसागर आदी उपस्थित होते. शिबिराचे नियोजन गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे रूपेश सरोदे, गणेश शिवशरण, रूपेश राजभर, सागर निंबाळकर, संजय साठे, प्रदीप क्षीरसागर ,जनक शहा, विकास मोरे, दिपक शेलकर, अजय शिंदे, अमोल गायकवाड, महेश सांळुखे,नझीर शेख यांनी केले.

( फोटो ओळ – गुलटेकडी : लसीकरण मोहिमेत नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला )