नाशिक, नगर जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढली; जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात वाढ

Koyana Dam

औरंगाबाद – अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने काल सकाळपासून जायकवाडी धरणात 57 हजार 457 क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने पाण्याची आवक सुरू आहे. 12 तासात धरणाचा जलसाठा 75 टक्के अशी भरघोस वाढ झाली असून, गेल्या 24 तासात नाशिक व नगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने धरण समूहातून … Read more

मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार ! 4 धरणे तर एक बंधारा तुडुंब

Koyana Dam

औरंगाबाद – मराठवाड्यातील एकूण धरणांपैकी चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा झाला आहे. तर जायकवाडी धरणात 56 टक्के जलसाठा असून खडका बंधारा शंभर टक्के भरल्याने तो आता ओसंडून वाहत आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला अति मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. यामुळे यावर्षी मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more

शेतकऱ्यांनी चिंता करू नये; जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला. दरम्यान आज रविवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील विविध गावात शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद … Read more

शहराचा विकास जातीय वादात अडकला; सतीश चव्हाणांचा हल्लाबोल

aurangabad

औरंगाबाद – शहराचा विकास जातीय वादात अडकला आहे. त्याचमुळे अतिशय महत्त्वाच्या व रहदारीच्या या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. स्थानिक मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा याठिकाणी सिद्ध होतो. मनपा व शासकीय अधिकारी नुसते बसुन राहतात. तसेच कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत. अशी घणाघाती टीका आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. यावेळी त्यांनी टीका करत अप्रत्यक्षपणे … Read more

धुवाधार पावसामुळे हर्सूल तलाव ओव्हरफ्लो; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

harsul

औरंगाबाद – मागील दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात सुरु असलेल्या धो-धो पावसामुळे जुन्या शहराची तहान भागवणारा ऐतिहासिक हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागरिक आनंदी झाले आहेत. मात्र प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण तलाव बघण्यासाठी व मासे पकडण्यासाठी हौशी बांधवांची मोठी गर्दी होत आहे. https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/582334429478075/ संपूर्ण जुन्या शहराला हर्सूल तलावातून … Read more

पाण्यातून वाट काढत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन केली पाहणी; नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश

pahmi

औरंगाबाद – मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले असुन प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय पुढारी आता पाहणी करीत आहेत. यातच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पैठण तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी दौरा चालू केला आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपला सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून … Read more

परभणी जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटला ! येलदरी धरण 100 टक्के भरले

Koyna Dam

परभणी – मागील दोन ते तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येलदरी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग सोडण्यात येईल म्हणता-म्हणता अखेर मंगळवारी मध्यरात्री वीज निर्मिती प्रकल्पाद्वारे २७०० व बुधवारी चार दरवाज्याद्वारे ८१३९.८१ क्युसेक्स विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. मागील आठ दिवसांपासून येलदरी धरणाच्या उर्ध्व भागातील खडकपूर्णा प्रकल्पामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. … Read more

औरंगाबादची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांकडे; सध्या ‘इतक्या’ क्युसेक क्षमतेने आवक सुरू

jaykwadi dam

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात सह मराठवाडा आणि नगरची स्थान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने धरण आता 50 टक्क्यांपर्यंत भरत आले आहे. धरणात सध्या 16 हजार 345 क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली असून, आज सकाळपर्यंत धरण 48 टक्के भरले होते. तसेच गुरुवारी सायंकाळपर्यंत धरण 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरेल, अशी … Read more

औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा वेगाने पाऊस; शहराची उडाली दाणादाण, अनेक भाग जलमय

rains

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्याने दाणादाण उडाली आहे. शहरात ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस बरसला आहे. यामुळे मात्र शहरवासियांची दाणादाण उडाली आहे. आज तब्बल १६६ मिमी ताशी वेगाने हा पाऊस आला. तर तासाभरात ८७.६ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती एमजीएम वेधशाळेने दिली आहे. या पावसाने निम्म्याहुन अधिक शहरात विजेचा पुरवठा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. … Read more

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार ! नदी- नाल्यांना पूर तर अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy Rain

औरंगाबाद – मागील 24 तासांपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून जाणे, पूल कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण 95 टक्के भरले असून, जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील … Read more