राज ठाकरेंच्या ‘त्या’ प्रश्नाचं सरकारकडे तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही

मुंबई । लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शहरांत होत असलेली गर्दी व गोंधळाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याची टीका मनसेनं केली आहे. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन टप्प्यांत एकेका गोष्टीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत. … Read more

‘हा’ अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? राज ठाकरेंचा राज्यपालांना पत्रातून खणखणीत सवाल

मुंबई । राज्यातील महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. मात्र, विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल आग्रही असून ‘विद्यार्थ्यांच्या … Read more

जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येताना… राज यांचे योगींना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई । यापुढे महाराष्ट्राला किंवा इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. योगी यांनी या नव्या नियमांसंदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना दिली होती. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज उद्धव यांना, म्हणाले बंधू ‘हे’ कराच…

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच्या बैठकीत केलेल्या सूचनासंदर्भात … Read more

मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे ‘मास्क’ विनाच

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते मंत्रालयात उपस्थित झाले होते. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या … Read more

जागतिक व्यंगचित्रकार दिन: राज यांनी बाळासाहेबांना ‘गुरु’ म्हणून अशी दिली होती मानवंदना

मुंबई । व्यंगचित्रकार म्हटलं कि महाराष्ट्रात एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आपल्या ब्रशच्या फाटकाऱ्यातून कित्येकांना झोडपणारे बाळासाहेब अवघ्या महाराष्ट्रानं पहिले आहेत. बाळासाहेबांच्या याच कलागुणांचा प्रभाव ठाकरेंच्या पुढच्या पिढीतील राज ठाकरे यांच्यावर पडला. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे ह्यांच्या हाताखाली व्यंगचित्रकलेचे धडे गिरवणाऱ्या राज ठाकरेंचं १९९९ सालचं ‘चेहरे मोहरे’ हे पहिलं प्रदर्शन म्हणजे … Read more

‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं! राज ठाकरेंनी ऋषी कपूर यांना वाहिली पत्रातून आदरांजली

मुंबई । हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यात असतानाच सिनेप्रेमींना आज दुसरा जबर धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. … Read more

राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ‘वाईन शॉप्स’ सुरु करायचा दिला सल्ला

मुंबई | देशात लाॅकडाउन सुरु होऊन आता जवळपास महिना होत आला आहे. या काळात सर्व दुकाने, हाॅटेल, कारखाने बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यापार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यात ठाकरे यांनी वाईन्स शाॅप सुरु करायचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंचे संपुर्ण पत्र खालीलप्रमाणे … Read more

राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांना ‘ही’ महत्त्वाची सूचना; म्हणाले..

मुंबई । कोरोनाच्या आजारातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्या संदर्भातील माहिती योग्य प्रकारे प्रसिद्ध केल्यास लोकांना दिलासा मिळेला. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास वाढेल. त्यामुळं आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी व केंद्र सरकारनं त्याबाबतचं एक न्यूज बुलेटिन काढावं, अशी महत्त्वपूर्ण सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. काल बुधवारी पुन्हा … Read more

मदतकार्याचे गॉगल लावून फोटो कसले काढता? ही वेळ आहे का ती – राज ठाकरे

मुंबई । ‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं … Read more