राज ठाकरेंची मनसे विधानसभा निवडणूक लढणार ; स्वतः राज ठाकरेंनी केली उमेदवारांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस राष्ट्र्वादीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज मनसे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील हे मनसेकडून विधानसभा निवडणूक लढणार आहेत असे स्वतः राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. … Read more

अखेर मनसे विधानसभा निवडणूक लढणार ; राज ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरे यांची मनसे आता विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे महाराष्ट्र विधानसभेच्या १०० जागा लढण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’वर विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यांनी या बैठकीत निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात बातचीत केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव आदी जिल्ह्यात … Read more

राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत थारा नाही : शरद पवार

नाशिक प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ च्या जुमल्याने भाजपला सळो की पळो करून सोडले. त्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मनसेला महाआघाडीत थारा दिला जाणार नाही असे म्हणले आहे. त्यामुळे मनसे नेमके काय पाऊल उचलणार हे बघण्यासारखेच राहणार आहे. राज … Read more

अजित पवारांचे राज ठाकरेंवर वादग्रस्त विधान ; म्हणून राज ठाकरे बोलायाचे बंद झाले

बारामती प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानावर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघते. अजित पवार यांना सत्य हे त्यांच्या अनोख्या ढंगात बोलण्याची सवय आहे. त्यांच्या अशा विशेष शैलीतच त्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला आहे. भाजपचे सरकार पैशावर आणि ईडीच्या भीतीवर राजकीय नेत्यांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे आधी किती बोलत होते मात्र … Read more

रिझर्व्ह बँकेबाबत राज ठाकरेंचं भाकित खरं ठरलं ? व्हिडिओ शेअर करत मनसेचा दावा

टीम, HELLO महाराष्ट्र |नोटाबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं भाकित खरं ठरलं, असं ट्वीट मनसेने केलं आहे. 9 ऑगस्टला राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत हा दावा करण्यात आला आहे. ‘नोटबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या ‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार’… हे राजसाहेबांचं … Read more

मनसेच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुंबईबाहेरील पहिला समर्थक असणाऱ्या संभाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे. संभाजी जाधव विद्यार्थी दशेपासूनच राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संभाजी जाधव यांनी नांदेडमध्ये चांगलं काम केलं होतं. व्यवसायाने शेतकरी असलेल्या संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढलं होतं. त्या नैराश्यातून 46 वर्षीय संभाजींनी जीवनयात्रा … Read more

मोदी-शहांची पण चौकशी झाली पाहिजे – खा. संजय राऊत

टीम, HELLO महाराष्ट्र | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवून चौकशी करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेबाबत खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया आज दिली. राज ठाकरे यांची ईडीने केलेल्या चौकशीबाबत आपल्याला काही खास वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच … Read more

नऊ नंबरची कार राज ठाकरेंसाठी ‘लकी’ ठरणार का ?

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून ईडीचे अधिकारी राज ठाकरेंना प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी चौकशीसाठी जाताना आपल्या लकी नऊ नंबरच्या कारने जाणे पसंत केले. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने ईडी कार्यालयापर्यंत जाणं यातून त्यांची काळजीही … Read more

राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी

टीम, HELLO महाराष्ट्र| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीकडून चौकशी होणार आहे. या कारवाईमुळे मनसैनिकांत असंतोष असून त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. या यंत्रणांना मी योग्य ती उत्तरे देईनच; तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन राज यांनी केले आहे. ईडीने राज यांना चौकशीस हजर राहण्यास बजावल्यानंतर … Read more

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई प्रतिनिधी | कोहिनूर स्क्वेअर प्रकरण राज ठाकरे यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आता निर्माण झाली असून त्यांना या प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीने बजावलेल्या नोटिसी नुसार राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे या प्रकरणी ईडीच्या चौकशीला हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष … Read more