Saturday, March 25, 2023

राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत थारा नाही : शरद पवार

- Advertisement -

नाशिक प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ च्या जुमल्याने भाजपला सळो की पळो करून सोडले. त्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मनसेला महाआघाडीत थारा दिला जाणार नाही असे म्हणले आहे. त्यामुळे मनसे नेमके काय पाऊल उचलणार हे बघण्यासारखेच राहणार आहे.

राज ठाकरे स्वतःच निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे येत्या काळात मनसेचे भवितव्य काय असा सवाल सर्वत्र विचारला जात आहे. त्याच बरोबर मनसे मधील नेते निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. तर राज ठाकरे हे निरुत्साही आहेत. त्यामुळे मनसे विधानसभा लढवणार की लढवणार नाही या बद्दल शंका निर्माण झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान विधानसभा निवडणूक येत्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे. तर दिवाळीच्या आठवडाभर आधी निवडणुका पूर्ण होतील असे शरद पवार यांनी म्हणले आहे. ते नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. मनसे अध्यक्ष आपल्याला निवडणुकीवर भहिष्कार टाका असे म्हणत होते. मात्र लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीपासून दूर राहणे योग्य नाही असे आपण राज ठाकरे यांना म्हणालो असा खुलासा देखील शरद पवार  यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.