राज्यात दिवसभरात तब्ब्ल १ हजार २३३ नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या १६ हजार ७५८ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ … Read more

गुड न्यूज! राज्यात २ दिवसांत ७०० कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत जवळपास ७०० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० … Read more

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली १५ हजार ५२५ वर; दिवसभरात ८४१ नवीन रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली आहे. आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ५४१ वर, दिवसभरात सापडले ७७१ नवीन रुग्ण

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात … Read more

राज्यात दिवसभरात ६७८ नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजार ९७४

मुंबई । आज दिवसभरात राज्यात ६७८ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२ हजार ९७४ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात ११५ कोरोनारुग्ण बरे झाले आहेत. तर २४ तासात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 678 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 12974 अशी झाली आहे. यापैकी 2115 … Read more

राज्यात दिवसभरात ७९० नवे कोरोनाग्रस्त, एकूण रुग्णांची संख्या १२ हजार २९६ वर

मुंबई । राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण ७९० नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. मुंबई, पुण्यासह आणखी काही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आज एकाच दिवसात करोनामुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 790 कोरोना … Read more

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १०,४९८ वर, दिवसभरात ५८३ नवीन रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांनी आज दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे नवीन ५८३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातीळ कोरोना बाधितांची संख्या १०,४९८ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज एकूण १८० कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर दिवसभरात राज्यात २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत … Read more

धक्कादायक! प्लाझ्मा थेरेपीने उपचार केलेल्या ‘त्या’ पहिल्या रुग्णाचा मृत्यू

मुंबई । कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं वरदान म्हणून पहिल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीवर आता प्रश्नचिन्ह तयार झालं आहे. कारण राज्यातील प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्का देणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग शनिवारी लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्याची माहितीसुद्धा राज्याचे आरोग्यमंत्री … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारच्या दारात, २४ तासात ५९७ नवीन रुग्ण

मुंबई । महाराष्ट्रात करोनाचा कहर कायम आहे. राज्यात आज करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली आहे. चिंतेची बात म्हणजे राज्यात काल करोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला होता तर आज ३२ रुग्ण दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज करोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची भर पडल्याने … Read more

हुर्रे! मुंबईत कोरोनाबधितावर केलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

नाशिक । मुंबईमधील लिलावती रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी  यशस्वी झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. “लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई … Read more