राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३१८ वर, २४ तासांत ७२९ नवे रुग्ण

मुंबई | राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे नवे ७२९ रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ९३१८ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधित रुग्ण मुंबई मध्ये सापडले आहेत. यापैकी 1388 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या ९३१८ वर#HelloMaharashtra #CoronaInMaharashtra pic.twitter.com/aS9rJ2I8mP … Read more

राज्यात ३ मेपर्यंत दुकानं बंदच राहणार – राजेश टोपे

मुंबई । कोरोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी एका आदेशान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. तसेच राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात असं या आदेशात म्हटलं गेलं होत. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया देत लॉकडाऊन संपेपर्यंत राज्यात कोणतीही … Read more

४० प्रयोगशाळांच्या मदतीने राज्याने गाठला कोरोना चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा

मुंबई । राज्यात गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आज राज्यात … Read more

मुंबई-पुण्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो

मुंबई । सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या ३ मे रोजी संपणार आहे. येत्या ४ मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. कदाचित या दोन्ही शहरांमधील कंटेन्मेंट झोनपर्यंत हा निर्णय मर्यादित … Read more

राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची मान्यता- राजेश टोपे

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत असून राज्याकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात असलेली मागणी आता केंद्र सरकारने मान्य केली आहे. राज्यात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आज … Read more

दिलासादायक! राज्यातील कोरोना हॉटस्पॉटच्या संख्येत घट; १४ वरून ५ वर

मुंबई । महाराष्ट्रात १४ हॉटस्पॉट होते ते आता ५ वर आले आहेत हे चित्र दिलासादायक आहे. औरंगाबाद, सांगली, अहमदनगर हे हॉटस्पॉट होते. मात्र आता ते हॉटस्पॉट नाहीत. मालेगाववर जास्त फोकस केला असता तर हॉटस्पॉट ४ झाले असते अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद … Read more

राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनच्या निकषात बदल- आरोग्यमंत्री

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानूसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान आता राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

मुंबई । राज्यात आज दिवसभरात 286 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ३२०२ कोरोना रुग्ण आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आत्तापर्यंत ३०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोना बाधीत रुग्णांना ते देऊन त्यांच्यातील अँटीबॉडीज वाढविण्याच्या नविन तंत्रज्ञानाचा वापर … Read more

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

Rajesh Tope

मुंबई । देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारच्या पार गेली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही वाढ होत आहे. देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. २० तारखेनंतर काही भागांत टाळेबंदीत शिथिलता येणार असल्याची चर्चा आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकृत भाष्य केले आहे. अत्यावश्यक सेवा, शेती याबाबत टाळेबंदीत शिथीलता आणण्याबाबत केंद्र शासनाकडून ज्या सूचना … Read more

महाराष्ट्र हे सर्वात जास्त कोरोना टेस्ट करणारं राज्य- राजेश टोपे

मुंबई । जागतिक आरोग्य संघटनेन कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर एकच उपाय सर्व देशांना सुचवला आहे तो म्हणजे टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट. जो देश जितक्या जास्त कोरोना टेस्ट करेल त्या देशात कोरोनाचा फैलाव होण्यास रोखता येऊन या महामारीवर लवकर नियंत्रण मिळवता येईल. असं असताना टेस्ट बाबतीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक आश्वासक आणि … Read more