धक्कादायक! अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची तस्करी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे टेम्पोच्या पुढील भागातील काचेवर औषधे आणि अत्यावश्यक सेवेचा कागद चिकटवून कर्नाटकातून क-हाडला जात असलेला तब्बल ८ लाखाचा गुटखा आटपाडी पोलिसांनी पकडला. उंबरगाव येथे तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. चालक ध्रुपचंद प्रेमचंद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक बजरंग कांबळे यांच्यासह उपनिरिक्षक अजित पाटील, … Read more

गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने सांगली भाजपात नाराजी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते. यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत … Read more

मुंबईहून सांगलीला आलेल्या तरुणाला भावानेच पोलिसांच्या ताब्यात दिले; तपासणी केली तर कोरोना झालेला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली शहरातील महसूल कॉलनीमध्ये मुंबईतून बेकायदेशीरपणे आलेली एक व्यक्ती कोेरोना पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. जत तालुक्यातील अंकलेमध्येही मुंबईहून आलेल्या एका चाळीसवर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोघेही मुंबईहून सांगलीत बेकायदेशीरपणे आले असल्याची माहिती समोर येत आहे. सांगलीतील महसूल कॉलनीमध्ये ५ मे रोजी रात्री मुंबईहून ‘तो’ तरुण घरी आला होता, … Read more

धक्कादायक! घरी फोन करण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मजुराकडून मजुराचा खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी गावच्या हद्दीत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कत्राटदाराकडे काम करणाऱ्या परप्रांतीय मजूराचा घराकडे फोन करण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या कारणावरून लोंखडी रॉडने मारहाण करून व गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कवठेमहांकाळच्या पोलीसांनी आरोपीस गुरूवारी अटक केली आहे. सिंकदर हरीप्पा गंजू … Read more

माहेरी निघून आलेल्या पत्नीला नांदायला ये नाहीतर घटस्फोट दे म्हणणाऱ्या जावयाला बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भांडण करून माहेरी गेलेल्या पत्नीस नांदन्यास येत नाहीस तर घटस्फोट दे असे सासरवाडीत जाऊन म्हणणाऱ्या जावयास पत्नीच्या नातेवाईकांकडून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी निखिल आप्पासाहेब कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशाल कांबळे, रामदास कांबळे, पत्नी दिपाली … Read more

टिकटॉकवरुन भिडे गुरुजींचा आक्षेपार्ह व्हिडीओ, अश्र्लील चित्रफीत व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात टिकटॉक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यासह कारकर्त्यांनी दिले आहे. जर या विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर … Read more

मुंबईहून आलेला ट्रकचालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह, सांगलीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मुंबई येथे ट्रकचालक म्हणून काम करणारा एकजण ट्रकमधून इस्लामपूरमध्ये आला होता. त्यानंतर टँकरमधून कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील त्याच्या गावी जात असताना मुंबई येथून आल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. आरोग्य तपासणीमध्ये तो संशयित वाटल्याने ताबडतोब त्याला मिरजेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांगलीची … Read more

‘बैलगाडी थाट’; कासर हातात धरून शासकीय कर्मचाऱ्यानं काढली बैलगाडीतून लगीन वरात

सांगली प्रतीनिधी । तासगाव तालुक्यातल्या लोढे गावात एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्न सोहळ्यासाठी वरातीच्या डामडौलाला टाळत नवरदेव चक्क बैलगाडीतून थेट लग्नमंडपात दाखल झाला. बडेजावपणाला फाटा देत शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या बैलगाडीतून मंगलकार्यालयात दाखल झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोढे गावच्या मनोज ठोंबरेच नुकतंच पेडच्या अश्विनी शेंडगेशी लगीन ठरलं. मनोज सांगलीच्या पाटबंधारे विभागात … Read more

धक्कादायक! मैत्रिणीचा पाठलाग का करता अशी विचारणा केल्याने तरुणाचा निर्घृण खून

सांगली प्रतिनिधी । सांगलीतील हसनी आश्रम परिसरातील लक्ष्मीनगर येथे मैत्रिणीचा पाठलाग का केला याचा जाब विचारल्याने आज एका तरुणाच्या डोक्यात बांबूने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आकाश अशोक शिऱ्यापगोळ असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मित्र शशिकांत अण्णाप्पा कल्लोळी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या … Read more

अहंपणा असलेली व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही – उज्ज्वल निकम

सांगली प्रतिनिधी । सुसंस्कृत व्हायचे असेल तर चांगल्या वाचनाची आवड आणि सवय हवी, मन सशक्त बनविण्यासाठी अनेक गोष्टी वाचल्या पाहिजेत असे आवाहन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केले. ग्रामपंचायत आणि रोटरी समाज दल हरिपूर संचालित मोफत वाचनालय हरीपूरच्या शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी निकम बोलत होते. निकम यांनी यावेळी संगमेश्वराचेही दर्शन घेतले. पुढे बोलताना निकम म्हणाले, … Read more