सांगलीच्या कृष्णा नदी उत्सवासाठी जलसंपदा, पाटबंधारे आणि महापालिकेकडून स्वच्छता मोहीम

सांगली प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या जलसंपदा विभागाकडून आजपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावर कृष्णा नदी उत्सवाला सुरवात झाली. पुढील सात दिवस सांगलीत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी कृष्णा नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. महापालिकेसह विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यानी यात सहभाग घेतला या निमित्त आज सांगलीच्या कृष्णेच्या घाटावर कलश पूजन करत या सात दिवसांच्या … Read more

‘आम्हाला संपविण्याची भाषा वापरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण’ – खासदार संजयकाका पाटील

सांगली प्रतिनिधी । आमचं राजकीय जीवन संघर्षाचे आहे. संघर्ष आम्हाला नवा नाही. कोणाला संपविण्याचा विषय नाही. दोन वर्षात आम्हाला संपविण्याची भाषा वापरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. बालिशपणे टोकाला गेले आहेत. लोकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी बोलले असतील. मी त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही. असा टोला खासदार संजय काका पाटील यांनी युवानेते रोहीत पाटील यांचे नांव न घेता … Read more

‘धन्याला खुश करण्यासाठी पडळकारांची बेताल वक्तव्ये’ : जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील

सांगली प्रतिनिधी । कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष व नेते रोहित पाटील यांच्या पाठीशी आहेत. पक्षातील काही मंडळी विरोधात आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील यांनी दिली. तर भाजपचे आ.गोपीचंद पडळकर धन्याला खूश करण्यासाठी बेताल वक्तव्ये करत आहेत त्यांनी हत्तीवर भुंकण्यापेक्षा विधायक कामे करावीत, असा टोला देखील पाटील यांनी … Read more

अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी परप्रांतीय नराधमास 20 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा

सांगली प्रतिनिधी । एमआयडीसीमध्ये सहकारी कामगार मित्राच्या एका मूकबधिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम परप्रांतीय कामगारास 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बलरामकुमार रामविलास गौतम असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली. सदरची घटना हि 2018 साली विमल सिमेंट पाईप कंपनीत घडली. … Read more

इस्लामपूरचे ईश्र्वरपूर नामकरण ठरावासाठी आयोजित केलेली विशेष सभा रद्द

सांगली प्रतिनिधी । इस्लामपूर शहरासह सांगली जिल्हयात चर्चेत असणाऱ्या इस्लामपूरचे ईश्र्वरपूर नामकरण ठरावासाठी आयोजित केलेली विशेष सभा गणपुर्ती अभावी रद्द करण्यात आली. इस्लामपूर नगरपालिकेत होणाऱ्या विशेष सभेकडे संपुर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष सभेला राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीचे सर्व नगरसेवक गैरहजर राहिले तर विकास आघाडीच्या 4 सदस्यांनी पाठ फिरवली. विशेष सभेत दुपारी बारा वाजेपर्यंत … Read more

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जनवादी महिला संघटनेचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । संपूर्ण देशात महागाईचा आलेख वाढतच आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईवर कोणतेही उपाययोज़ना केंद्र सरकार करत नाही. याच्या निषेधार्थ सांगलीतील स्टेशन चौक येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय … Read more

सांगली महापालिकेच्या प्रसूतीगृहात अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण

सांगली प्रतिनिधी । महापालिकेच्या प्रसूतीगृहात सोनोग्राफी मशिनची आवश्यकता होती आता अत्याधुनिक मशिन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय थांबेल, असा विश्वास महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. सांगली प्रसूतिगृहात अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण महापौर दिग्विजय सुर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते झाले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीकडून अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आले आहेत. मिरज … Read more

सांगलीत भाजपकडून शहीद जवानांना वाहण्यात आली श्रद्धांजली

सांगली प्रतिनिधी । हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत भारताच्या सर्व सैन्य दलाचे सरसेनापती बिपिन रावत यांचे निधन झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी व अन्य अधिकारी यांचेही निधन झाले. या घटनेनं संपूर्ण देश सुन्न झाला. या घटनेत शाहिद झालेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना सांगलीत भाजपच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. बिपीन रावत यांच्या प्रतिमेला हार घालून कॅडल लावून श्रद्धांजली … Read more

सांगलीतील महालसीकरण अभियानात 86 केंद्रावर 23 हजार नागरिकांनी घेतली कोविडवरील लस

सांगली प्रतिनिधी । सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्यावतीने आयोजित दोन दिवसांच्या महालसीकरणा मोहिमेत 23 हजार 321 जणांनी लसीचा डोस घेतला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी दोन दिवसात आरोग्य यंत्रणेने चोख नियोजन केले होते. सांगली महापालिका क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विशेष महालसीकरण मोहिमेत एकूण 19 हजार 255 नागरिकांनी पहिला डोस घेतला होता. … Read more

सांगली जिल्ह्यातील तीनही नगरपंचायतीत होणार तिरंगी लढत

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपणार असून त्यानंतर जरी या तिन्ही पंचायतीतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी साधारणपणे या तिन्हीही पंचायतीत निवडणूक तिरंगी होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. शासनाने ओबीसींच्या जागेवरील निवडणुका स्थगित केल्यामुळे एकूण 39 जागांसाठी आता 213 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. … Read more