श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उसयनराजे भोसले यांची आज दिल्ली येथे भेट झाली. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या पाटील यांनी दारुन पराभव केला होता. आता या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुल अकाऊंटवर … Read more

Breaking | उदयनराजे ९४ हजारांनी पिछाडीवर

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत असतानाचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उदयनराजे भोसले सध्या पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील ९४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून खासदारकी मिळविली होती. मात्र काही महिन्यात उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन … Read more

घड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला ! सातार्‍यात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, सातार्‍यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिह्यातील नवलेवाडीमध्ये मतदान केंद्रावर घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे.

साताऱ्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान सुरू झाल्यावर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घड्याळासमोरील बटन दाबले. मात्र व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत जात होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या तिथल्या निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घड्याळाला मतदान केले तरी ते कमळाला जात असल्याचं मान्य केल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यानंतर सदर ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं. मात्र, गंभीर घटनेबाबत आता पुढे निवडणूक आयोगाकडून काय कार्यवाही केली जाणार याबाबतच तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/445764886054352/

‘मोदी तर पेढेवालेसुद्धा’ असं म्हणणार्‍या उदयनराजेंच्या प्रचाराला पंतप्रधान ‘या’ दिवशी सातार्‍यात

सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ राज्यात एकुण नऊ सभा घेणार आहेत. त्यातील पहिली सभा सातार्‍यात होणार असल्याचे समजत आहे. पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबर रोजी सातार्‍यात येणार असून उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा लोकसभा जिंकणे भाजप साठी प्रतिष्ठेचे बनले आहे. सातारा येथील … Read more

लोकसभा पोटनिवडणूक : उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आघाडीचे उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निडणुकीच्या सोबत लागणार आहे. त्यामुळे उदयनराजे यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने हि जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभा राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. [youtube https://www.youtube.com/watch?v=fnU1IHkp9iY&w=560&h=315] … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण?

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने पक्ष सोडून गेलेल्या उदयनराजे भोसले यांना चोख प्रतित्तर देण्याचे ठरवले असून यासाठी राष्ट्रवादी नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर सातारच्या लोकसभा पोटनिवडणुकीचे चित्र ठरणार … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेची ‘ही’ आहे भूमिका

मुंबई प्रतिनिधी| सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. घोषणेनंतर शिवसेनेची भूमिका नेमकी काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला ही जागा शिवसेनेने लढवली होती. मात्र शिवसेनेने या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत घोषित झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपची निवडणुकीच्या संदर्भाने लगबग सुरु … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होणार ; निवडणूक आयोगात तशा हलचाली

नवी दिल्ली | लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना निवडणूक आयोगाने शनिवारी चांगलाच धक्का दिला. निवडणूक आयोगाकडून शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली मात्र साताऱ्याची लोकसभेची पोटनिवडणूक मात्र जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणीत वाढच झाली. मात्र आता निवडणूक आयोग २७ तारखेला निघणाऱ्या विधानसभेच्या अधिसूचनेसोबत साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणूकीची देखील अधिसूचना काढण्याच्या तयारीत आहे. … Read more

आता साताऱ्यात गुलाल उधळायला बोलवा- शरद पवार

सातारा प्रतिनिधी। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात गेल्यानंतर राष्ट्रवादीचा गड सावरण्यासाठी साता-यात कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आल होतं. या निमित्ताने शरद पवार रविवारी साता-यात आले होते.  यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने शहरातुन भव्य र‌ॅली काढत पक्षाची ताकद दाखवुन दिली, तर यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी “सरकार किल्ले पर्यटणासाठी देते परंतू छत्रपतीच्या पराक्रमाची ही प्रतिकं … Read more

Big breaking | राष्ट्रवादीचं ठरलं, उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील लोकसभा लढणार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आह. राष्ट्रवादीच्या एक बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. शरद … Read more