कराडच्या 19 वर्षांपूर्वीच्या मोठ्या उड्डाणपूलावर पडला हातोडा

Flyover Demolition Work Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील 19 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला उड्डाणपूल रविवारी रात्रीच्या सुमारास पाडण्यात आला. तत्पूर्वी पूल परिसरातील महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती. पूल पाडण्यासाठी 8 अत्याधुनिक मशिन, पोकलॅन, डंपर यासह अन्य वाहनांचा उपयोग केला जात आहे. कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याच्या कामास ८ फेब्रुवारीपासून … Read more

उदयनराजेंच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी मंजूर

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहराच्या दक्षिणेकडे विलासपूर आणि लगतच्या परिसरातील सुचवलेली साडेचार कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून नुकतीच मंत्रालयातून या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले. … Read more

प्रांत मुंबईला गेले अन् आजारीही पडले : पालकमंत्री म्हणाले…चाैकशी लावा

Shamburaj Desai

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके अधिकारी म्हणतो प्रांत मुंबईला गेले, तहसिलदार म्हणतात प्रांत आजारी पडले मंत्री शंभूराज देसाई म्हणाले चाैकशी लावा अन् खुलासा करा. खंडाळा तालुक्यातील विंग येथे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दाैरा काल होता. मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यक्रमाला खंडाळा तालुक्याचे प्रातांधिकारी अनुपस्थित नव्हते. यावरून मंत्री श्री. देसाई यांना … Read more

सह्याद्रि साखर कारखान्याच्या वतीने शक्तीमान “प्रोटेक्टर 600” यंत्राने फवारणी

Spraying by Shaktiman "Protector 600" machine

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाच्या शेती व ऊसविकास विभागाच्या वतीने ऊस लागण व खोडवा पिक व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत माळवाडी (मसूर) येथे शक्तीमान कंपनीच्या “प्रोटेक्टर 600” फवारणी यंत्रचे प्रात्यक्षिक राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये एकावेळी 600 लिटर पाणी व औषधांचे मिश्रण … Read more

Satara News : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी : व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी

Voice of Media Satara

सातारा | रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी प्रकल्प विरोधात बातमी दिल्यामुळे अंगावर चारचाकी वाहन घालून जाग्यावर ठार मारले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर योग्य ती कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया सातारा जिल्हा, कराड तालुका संघटनेच्यावतीने निवेदन देवून करण्यात आली. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख … Read more

मंगल कार्यालयातून नवरीचे दागिने चोरीला

Gold Price Today

सातारा | पारगाव (ता. खंडाळा) येथील एका मंगल कार्यालयात लग्नासाठी आलेल्या वधूचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असे 1 लाख 58 हजार रुपयांच्या ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव येथील मंगल कार्यालयात दुपारी लग्न असल्याने पिंपळे गुरव (पुणे) येथील वधूकडील वऱ्हाड लग्नाच्या आदल्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी पारगाव … Read more

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अज्ञांताकडून नासधूस, केबल कापली

Zilla Parishad Satara

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील वाल्मिकी पठारावरील कारळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अज्ञातांनी नासधूस केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केबल कापून शालेय पोषण आहार साहित्य व कागदपत्रांचे नुकसान केले. यासंदर्भात ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी, वाल्मिकी पठारावरील कारळे या दुर्गम व डोंगराळ गावातील शाळा सकाळी नेहमीप्रमाणे उघडल्यानंतर वर्गात मोठ्या प्रमाणात … Read more

जुन्या भांडणातून डोक्यात दगड घालून खून : दोघांना अटक

Medha Crime

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके जावली तालुक्यातील मेढा गावच्या हद्दीत मेढा- महाबळेश्वर रोडवर एका युवकाचा खून झाला. जुन्या भांडणाच्या रागातून डोक्यात दगड व लाकडी फळी मारहाण करून खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. अक्षय सोमनाथ साखरे व परमेश्वर गणपत पवार (दोघे रा. मेढा) अशी अटक केलेल्या … Read more

पुणे बंगलोर महामार्गावर 5-6 कि.मी. वाहनांच्या रांगा; रोजच्या वाहतुक कोंडीला जबाबदार कोण? कोणत्या उपाययोजना गरजेच्या

Karad News

कराड : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा एक अतिशय महत्वाचा महामार्ग समजला जातो. मात्र या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून होत असलेली वाहतुक कोंडी प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कराड शहराजवळ महामार्गावर रोजच लागणार्‍या 5-6 कि.मी. वाहनांच्या रांगा नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रोजच्या ट्राफिक जाममुळे कराडकर त्रस्त झाले आहेत. या नित्याच्या वाहतुक कोंडीला जबाबदार कोण … Read more

लादी पाव दर वाढीसाठी तीन दिवस बेकरी बंद

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके साताऱ्यातील लादी पाव बेकरी असोसिएशनच्या वतीने तीन दिवस बेकरी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 10 ते 12 फेब्रुवारी असे तीन दिवस बेकरी मधून लादी पाव चे उत्पादन केले जाणार नाही. उत्पादन करण्यात येणाऱ्या लादी पावाला भाव वाढवून मिळावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच बेकरी लादी … Read more