”डायल 112” : चिमुरडीवर अत्याचार करणारा 65 वर्षीय नराधम 10 मिनिटांत गजाआड

Mahableshwer

रत्नागिरी- सातारा | महाबळेश्वर (जि. सातारा) येथे पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या वृद्धाला पकडण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांच्या ”डायल 112” वर कॉल केला. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत पोलिसांना हवा असलेला संशयित नराधमला रत्नागिरी बसस्थानकातून ताब्यात घेण्यात आला. या संशयितावर लैंगिक अत्याचारासंधार्भात पॉस्को अंतर्गत गुन्हा … Read more

नारळाच्या झाडावरून पडून युवकाचा मृत्यू

कराड | कोयना वसाहत (ता. कराड) येथील गोपाळवाडी येथे नारळाच्या झाडावरून पडून 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या घटनेने गोपाळवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड- मलकापूर शहरालगत कोयना वसाहत ग्रामपंचायत आहे. या गावच्या हद्दीत राहुल प्रकाश चव्हाण हा युवक गोपाळवाडीत कुटुंबियांच्यासह वास्तव्यास आहे. तो लाहोटीनगर येथे शुक्रवारी नारळाच्या … Read more

शताब्दी महोत्सव : कराडचे शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूल स्थापनेला 100 वर्षे पूर्ण

Tilak High School Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात उच्च गुणवत्ता, संस्कार व देशभक्तीचे धडे देणारी शिक्षण संस्था म्हणून ‘शिक्षण मंडळ कराड’ या शिक्षण संस्थेची ख्याती आहे. आज शिक्षण मंडळ संस्थेस व टिळक हायस्कूलच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने संस्था व टिळक हायस्कूल च्यावतीने शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिनेश थोरात बिनविरोध

Karad- Patan Teachers Society

कराड | कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदी गुरुजन एकता पॅनलचे दिनेश थोरात यांची तर व्हाईस चेअरमन पदी अनुसया पवार यांची बिनविरोध निवड झाली. गुरूजन एकता पॅनेलने सत्तांतर करत एकहाती विजय मिळवला होता. यामध्ये सर्वात जास्त 1 हजार 551 मतांनी विजयी झालेले दिनेश थोरात यांना चेअरमन पदाचा बहुमान मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी संदिप … Read more

साताऱ्यात घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन : पोलीस ठाण्यात तक्रार

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबतची माहिती अशी, सातारा नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेले 2 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे आज सकाळी कर्मचाऱ्यांनी पगार कधी मिळणार, अशी विचारणा केली. तेव्हा … Read more

तापोळा पर्यटनासाठी 4.17 कोटीचा आराखडा : आ. शंभूराज देसाई

Tapola tourism

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके तापोळा परिसर पर्यटन क्षमता वाढीबाबत 4.17 कोटींचा पर्यटन विकास आराखडा प्रादेशिक पर्यटन कार्यालयास सादर करण्यात आला आहे. यामधून तापोळा परिसरातील विकास कामे करण्यात येणार आहे. याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा. दरे येथील उत्तेश्वर देवस्थान तिर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जा मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर उतेश्वर तिर्थक्षेत्र … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्तेसाठी फार्म्युला : मोदींच्या विरोधात 65 टक्के मते

Prithviraj Chavan Narendra Modi

औरंगाबाद | काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता, सरकार बदलले होते. तसेच परिवर्तन आपल्याला आता करायचे आहे, त्यासाठी एकास एक उमेदवार उभा करून, मोदींच्या विरोधातील 65 टक्के मते वाया जाऊ दिली नाहीत, तर मोदींचा पराभव शक्य आहे, असा फॉर्म्युला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. कुंभेफळ येथील काँग्रेस सेवा दलाच्या … Read more

विकासाचा महामेरू खा. श्रीनिवास पाटील : सातारा लोकसभा मतदार संघाला 150 कोटीचा निधी मंजूर

MP Shrinivas Patil

कराड। जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे सातारा लोकसभा मतदार संघातील 26 रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 3 अंतर्गत तब्बल 150 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुसंगाने सातारा, जावली, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, वाई, कराड व पाटण या 8 तालुक्यातील रस्त्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती खा. श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली … Read more

पती- पत्नीच्या वादातून स्वतःच्या दोन चिमुकल्याचा खून : बापाला जन्मठेप

Shirval Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आपल्या पश्चात पत्नी आपल्या मुलांचा सांभाळ करणार नाही. असे वाटल्याने बापाने आपल्या दोन चिमुकल्याचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणात सातारा न्यायालयाने आरोप बापास जन्मठेप व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पती- पत्नीच्या घरगुती वादातून मुलगी गौरवी (वय- 11), मुलगा प्रतीक (वय- 7) याचा … Read more

जिल्ह्यातील कृषिविक्रेत्यांचा 16 जानेवारीपासून बेमुदत बंदचा निर्णय

agricultural vendors

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी रासायनिक खत उत्पादकांकडून दुकानदारांना होणारे लिंकिंग, एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय व त्याअनुषंगाने शासनाच्या होणाऱ्या आदेशाचे उल्लंघन तसेच रासायनिक खत, बी-बियाणे व कीटकनाशके यांचे नमुने अप्रमाणित आलेनंतर होणारी कारवाईसह विविध मागण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कृषिविक्रेत्यांनी 16 जानेवारीपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील निवेदन कृषी विक्रेता संघटनेने जिल्हाधिका-याना दिले आहे. कृषी विक्रेता … Read more