डोंगरात दगडाने ठेचून महिलेचा खून; आरोपी पसार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी डोंगरात जळण आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना वनवासमाची, ता. कऱ्हाड येथे मंगळवारी मध्यरात्री उघडकीस आली. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून खुनानंतर हल्लेखोर पसार झाला आहे. लता मधूकर चव्हाण (वय 45) असे खून झालेल्या महिलेचे … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर कराड हद्दीत ‘या’ वेळेत अवजड वाहतूक बंद राहणार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बंगळूर महामार्गावर कराड येथे सुरू असलेल्या उड्डाण पुल कामाचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. याचा फटका नागरिकांसह दहावी-बारावी परिक्षार्थींना बसत आहे. परिक्षा कालावधीत महामार्गावर सकाळी 8 ते 10 या वेळेत गोल्डन हावर्समध्ये अवजड वाहतूक बंद करण्याबरोबर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज … Read more

उदयनराजेंचं चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यताऱ्यावर काढा; शिवेंद्रराजे भोसलेंचा टोला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खासदार उदयनराजे यांच्या चित्राचा वाद हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि जम्मू-काश्मीरच्या वादापेक्षाही गहन आहे. त्यांचे चित्र काढायला देत नाहीत याची चर्चा राज्यसभेत होणार असल्याची माहिती मला समजत आहे. त्यांचे चित्र नेमकं कुठं काढायचं याचा निर्णय आता राज्यसभाच देईल. मात्र, चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावरच काढावे, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले … Read more

महापालिका – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘मविआ’ एकत्रित लढणार; पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्रित लढणार का? अशी शंका व्यक्त केली जात होत. मात्र, काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्हीही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असल्याचे मोठे विधान केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

कोणतही विना परवाना कृत्य सहन केलं जाणार नाही; उदयनराजेंच्या चित्रावर शंभूराज देसाईंचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे भिंतीवर चित्र काढण्यावरुन उदयनराजे यांचे कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये चांगलाच वाद झाला. या प्रकरणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणतही विना परवाना कृत्य साताऱ्यात सहन केलं जाणार नाही. वेळप्रसंगी कायद्याचा वापर करावा लागला तरी चालेल,” असा इशारा मंत्री देसाई यांनी दिला आहे. सातारा येथे … Read more

उदयनराजेंच्या पेंटिंगवरून कार्यकर्ते-पोलिसांच्यात शाब्दिक चकमक; साताऱ्यात तणावाचे वातावरण

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत या निवासस्थाना नाजिक खासदार उदयनराजे यांच्या मालकीचे इमारतीवरील भिंतीवर पेंटिंग काढण्याचे काम सुरु होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांना पेंटिंग मज्जाव केल्याने पोलीस व उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी कार्यकर्त्यांनी थेट इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिल्याची घटना मंगळवारी घडली आहे. … Read more

उदयनराजे भोसलेंच्या हस्ते ‘मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशन’च्या बोधचिन्हाचे जलमंदिरमध्ये अनावरण

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील जलमंदिर निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशनच्या बोधचिन्हाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. जलमंदिर येथील निवासस्थानी नुकतीच शिवकालीन मर्दानी खेळांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेवेळी मर्दानी खेळांना शासकीय पातळीवरील मान्यता … Read more

कराडकरांनो पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडीची अडचण आल्यास थेट माझ्याशी बोला  

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्यासाठी बंद करण्यात आला आणि वाहतूक सर्विस रस्त्यावरून वळवण्यात आली. मात्र, वाहतुकीला रस्ता अपुरा पडल्याने तब्बल सहा ते सात किलोमीटरच्या महामार्गावर रांगा लागल्या. यातच दहावी-बारावीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. याबाबात माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ सूचना … Read more

साताऱ्याप्रमाणे कराडातही मोक्काची कारवाई करा !

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा पोलिसांनी आज साताऱ्यातील मटका चालकावर मोक्का कारवाई केली. परंतु कराड शहरातील अशा पद्धतीचे मटका व्यवसायिकांचे उच्छाद वाढला आहे. तेव्हा त्याच्यावर कधी कारवाई होणार? त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी कराड शहरातील अवैध व्यावसायिकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते आनंदराव लादे यांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

पिंपळे खुर्दजवळ दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील पिंपळे खुर्द गावाजवळ असलेल्या दोस्ती ढाब्याजवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सायकलस्वार दोघे युवक जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, (रा. पाडेगाव, ता. खंडाळा) येथील स्वराज स्वरूपकुमार जानकर हा बुलेटवरून (MH 12TE 3006) पाडेगावकडे निघाला होता … Read more